facebook pixel
chevron_right Business
transparent
फॉरन टूर्सची संधी; विमानतिकीट ३० % स्वस्त -Maharashtra Times
जगभरात भटकंती करणाऱ्या भारतीयांसाठी विमान कंपन्या तिकीट दरात ऑफर्सवर ऑफर्स देऊ लागल्या आहेत. आखाती देशांहून परतीचं तिकीट १० हजार रुपयांत, युरोपीय देशांहून ३३ हजार रुपये तर उत्तर अमेरिकी देशांहून परतीचं तिकीट ५५ हजार रुपयांपासून उपलब्ध आहेत. काही भारतीय आणि विदेशी कंपन्या या पॉप्युलर रुट्ससाठी सामान्य दरांपेक्षा ३० टक्के स्वस्त दरात तिकीट देत आहेत. कंपन्या विविध कालावधीत सेलची ऑफर देत आहेत. ठराविक कालावधीत प्रवास केल्यास तिकीटावर ऑफर्स आहेत. विदेशी कंपन्यांचं अनुकरण करत भारतीय कंपन्या ऑफर्स देत आहेत.
म्युच्युअल फंडांचा लाभांश पर्याय -Maharashtra Times
म्युच्युअल फंडाची कोणतीही योजना - मग ती डेट, इक्विटी किंवा हायब्रिड असो, त्यांना मिळालेल्या नफ्यातून (रिअलाइज्ड प्रॉफिट) युनिटधारकांसाठी या योजना लाभांश जाहीर करू शकतात. या योजनांनी विशिष्ट किंमतीला त्यांच्या पोर्टफोलिओसाठी भाग घेतलेले असतात. हे भाग त्यापेक्षा अधिक किंमतीला विकून जो नफा मिळतो किंवा व्याज मिळते किंवा या बागांवर संबंधित फंडालाच लाभांश मिळतो तो रिअलाइज्ड प्रॉफिट असतो. हा नफा म्युच्युअल फंड लाभांशाच्या रूपाने वितरित करतात. नियमांनुसार, रिअलाइज्ड न झालेला नफा हा लाभांश म्हणून वितरित करता येत नाही. हा नफा एनएव्हीमध्ये मिळवला जातो.
हाय एंड स्मार्ट फोन्स महागण्याची शक्यता
मेक इन इंडियाचा नारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याआधीच दिला आहे. भारतामध्ये उत्पादन क्षेत्राला चालना मिळावी, आयात वस्तुंचे प्रमाण घटावे, देशांतर्गत रोजगार निर्माण व्हावा, विदेशी चलन वाचावे आणि त्यादृष्टीने मेक इन इंडियाला द्यावी असे हे एकंदर धोरण आहे. अर्थात, आत्तापर्यंत ठोस उपाय या धर्तीवर योजण्यात आलेले दिसलेले नाहीत, परंतु यंदाच्या बजेटमध्ये या अनुषंगाने पावले उचलण्यात येतील असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल म्हणजे आयात फोन महाग होण्याची शक्यता आहे.
गृहकर्जदारांचा EMI जास्त कर वाचवणार का?
घर घेणं हे करोडो भारतीयांसाठी आजही स्वप्नंच आहे. परवडणारी घरं उपलब्ध करून देणं असो की अशा स्वस्तातल्या घरांसाठी काही अनुदान वा योजना असोत, सरकारही गरीबांच्या घरांसाठी प्रयत्नशील असल्याचं दिसून येतं. त्यामुळे यंदाच्या बजेटमध्ये घरखरेदीसंदर्भात काही दिलासा देणाऱ्या बाबी असतील का असा विचार विविध स्तरांतून होत आहे. तसेच सगळ्यात जास्त रोजगार निर्माण करणारं क्षेत्र म्हणून बघितल्या जाणाऱ्या रीयल इस्टेट क्षेत्राला संजीवनी मिळेल अशी काही उपाययोजना या बजेटमध्ये असेल का याची उत्कंठाही या क्षेत्रातल्या धुरीणांना लागली आहे.
इन्कम टॅक्सपासून मुक्ती देणार का मोदी सरकार?
नरेंद्र मोदी सरकार धक्कादायक निर्णय घेण्यासाठी ओळखले जात असून प्राप्तीकर किंवा इन्कम टॅक्स रद्द करण्यासारखा धडाडीचा निर्णय हे सरकार घेईल का अशी चर्चा पुन्हा जोर धरू लागली आहे. अर्थक्रांतीचे अनिल बोकिल ते सुब्रमण्यम स्वामी यांच्यापर्यंत अनेकांनी इन्कम टॅक्स रद्द व्हावा अशी मागणी वेळोवेळी केली आहे. तर सुरजीत भल्लांसारख्या अर्थतज्ज्ञांना एकच समान कर असावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. सध्या १० ते ३० टक्के इतका प्राप्तीकर असून एकूण लोकसंख्येच्या तुलनेत फार कमी लोक प्राप्तीकराच्या कक्षेत येतात.
हाउसिंग सोसायटी सदर -Maharashtra Times
सक्रिय सदस्यालाच निवडणुकीचा अधिकार. प्रश्न अंधेरी पश्चिमेला एस. रोडवर आमची ४० सभासदांची ४५ वर्षे जुनी सोसायटी आहे. २८ मे २०१७ रोजी, निवडणूक आयोगाने पाठवलेल्या अधिकाऱ्याच्या उपस्थितीत, व्यवस्थापन समितीच्या आठ सभासदांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली. काही कारणास्तव चेअरमन व एका मॅनेजिंग सभासदाने राजीनामा दिला आहे.
'इस्रायली सहकार्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट'
मुंबई - इस्राईल आणि भारत यांच्या कृषी क्षेत्रातील सहकार्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल, असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला. सीआयआय आणि अन्य उद्योजक संघटनांच्या परिषदेत ते बोलत होते. इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू हे या परिषदेत उपस्थित होते. भारत व इस्राईल हे सर्वांत चांगले भागीदार बनू शकतात, असा विश्‍वास नेतान्याहू यांनी व्यक्त केला. यानंतर बोलताना फडणवीस यांनी येथील ज्यू समाजाने राज्याच्या प्रगतीस हातभार लावल्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. मराठवाड्यासाठी वॉटरग्रीड तयार करण्यासाठी इस्राईलबरोबर होत असलेल्या कराराचा उल्लेखही फडणवीस यांनी केला.
तेजी वाढता वाढता वाढे
मुंबई - बॅंकिंग क्षेत्रातील थेट परकी गुंतवणुकीची मर्यादा वाढविण्याच्या वृत्ताने उत्साहित झालेल्या गुंतवणूकदारांनी गुरुवारी (ता. १८) बॅंकिंग शेअर्सची जोरदार खरेदी केली. यामुळे सेन्सेक्‍स आणि निफ्टीतील तेजीला बळ मिळाले. दिवसअखेर सेन्सेक्‍सने १७८.४७ अंशांच्या वाढीसह ३५,२६० अंशांवर बंद झाला. निफ्टीने २८.४५ अंशांची वाढ नोंदवीत १०,८१७ अंशांपर्यंत मजल मारली आहे. दोन्ही निर्देशांकांनी आज पुन्हा नवा उच्चांक नोंदविला आहे. खासगी बॅंकांमधील थेट परकी गुंतवणूक १०० टक्‍क्‍यांपर्यंत आणि सार्वजनिक बॅंकांमधील परकी गुंतवणूक ४९ टक्‍क्‍यांपर्यंत वाढविण्याचा सरकार विचार करत आहे. त्याचा परिणाम बॅंकांच्या शेअर्सवर दिसून आला.
'एकत्रित वाटचाल गरजेची'
मुंबई - इस्राईल आणि भारत हे दोन्ही देश नावीन्यपूर्ण संकल्पनांचे जनक आहेत. ज्यांच्याकडे नावीन्यपूर्ण संकल्पना आहेत, त्यांचेच भवितव्य उज्ज्वल आहे. त्यामुळे या दोन्ही देशांतील उद्योजकांनी नावीन्यपूर्ण संकल्पना घेऊन एकत्रित वाटचाल करणे जरूरी आहे, असे इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी गुरुवारी येथे सांगितले. सीआयआय आणि अन्य उद्योजक संघटनांच्या उद्योजक परिषदेत ते बोलत होते. या वेळी त्यांनी उद्योजकांसमोर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतिसुमने उधळलीच; पण दोन्ही देशांतील भागीदारीचे स्वागत करताना भारतीय उद्योजकांना आमंत्रणही दिले. इस्राईलच्या तंत्रज्ञानामुळे भारतीय शेती क्षेत्राला फायदा होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
करचुकवेगिरीसाठी बिटकॉइन भेट -Maharashtra Times
ईटी वृत्त, मुंबई बिटकॉइनची खरेदी करणाऱ्या मुंबईतील एका कापडविक्रेत्याची चौकशी प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी केल्यानंतर या व्यापाऱ्याने हे आभासी चलन प्राप्तिकर चुकवण्यासाठी दुबईस्थित भावाला हस्तांतरित केल्याचे स्पष्ट झाले आहे. 'भावाला बिटकॉइनचे हस्तांतरण करण्यासाठी त्याचे रूपांतर दोन वेगवेगळ्या आभासी चलनांमध्ये (अटेंशन टोकन आणि लाइटकॉइनध्ये) केले. त्यानंतर भावाच्या दुबई येथील आभासी चलनाच्या वॉलेटमध्ये रक्कम हस्तांतर केले,' असा दावाही या कापडविक्रेत्याने केला आहे. मुंबईपासून ३०० किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या एका तीस वर्षीय हिरे विक्रेत्यानेही वरील मार्गाची निवड केली.
इस्त्रायली उद्योजकांनी राज्यात गुंतवणूक करावी
देश विदेशातील ५० टक्के उद्योजकांनी राज्यात आर्थिक गुंतवणूक केली आहे. महाराष्ट्र हे उद्योग अग्रणी राज्य असून इस्त्रायलच्या उद्योगपतींनी येथे उद्योग सुरु करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी येथे केले. ताज हॉटलेमध्ये आयोजित 'भारत इस्त्रायल उद्योग संमेलना' प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेत्यान्याहू उपस्थित होते. महाराष्ट्रात उद्योग वाढीस पोषक वातावरण आहे. आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. देशातील अन्य राज्यांपेक्षा सर्वात मोठी ५० टक्के आर्थिक गुंतवणूक या राज्यात झाली आहे.
बँकांमुळे निर्देशांक वर -Maharashtra Times
वृत्तसंस्था, मुंबई सरकारी बँकांमधील सरकारचा हिस्सा कमी केला जाणार आणि खासगी बँकांतील थेट परदेशी गुंतवणुकीत (एफडीआय) वाढ केली जाणार या वृत्तांमुळे भांडवल बाजारातील बँकिंग क्षेत्राने गुरुवारी आपला आनंद जाहीर केला. परिणामी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १७८.४७ अंक वर जात ३५२६०.२९वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २८.४५ अंकांनी वधारत १०८१७ वर स्थिरावला. त्यातच परदेशी गुंतवणूकदार संस्थांनी दिवसभरातील सत्रांमध्ये भांडवल बाजारावर दाखवलेला विश्वास कायम ठेवला आणि मोट्या प्रमाणावर भांडवल बाजारात आणले. त्याचवेळी देशी गुंतवणूकदार संस्थांनी भागखरेदी सपाटा लावला.
दागिनेखरेदी पुन्हा रडारवर -Maharashtra Times
वृत्तसंस्था, नवी दिल्ली काळ्या पैशावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने पहिल्यापासूनच उपाययोजना केल्या आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून केंद्र सरकार आता सहा लाख रुपयांहून अधिक किंमतीच्या दागिन्यांच्या खरेदीला चाप लावणार आहे. एका वेळी सहा लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या दागिन्यांची खरेदी झाल्यानंतर संबंधित दुकानदाराने या व्यवहाराची माहिती 'फायनान्शियल इंटलिजन्स युनिट'ला (एफआययू) देणे बंधनकारक करण्यात येण्याची शक्यता आहे. अर्थ मंत्रालयातील वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या केंद्र सरकार या प्रस्तावावर विचार करीत आहे. आगामी काळात काळा बाजार करणाऱ्यांचे सर्व मार्ग बंद करण्याचा निर्धार केला आहे.
'येत्या ३ वर्षांत बँका होणार कालबाह्य' -Maharashtra Times
प्रत्यक्ष बँका येत्या तीन वर्षांत कालबाह्य होतील, असे नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अमिताभ कांत यांनी गुरुवारी येथे सांगितले. डिजिटल पद्धतीने माहितीचे वहन व माहितीचे विश्लेषण यांमुळे सर्वसमावशेक आर्थिक विकासाला चालना मिळणार असल्याने ही स्थिती निर्माण होणार आहे. एका पॅनल चर्चेदरम्यान कांत बोलत होते. ते म्हणाले, प्रत्यक्ष बँकिंग भावी काळात कमी होईल. डिजिटल मंचावर प्रचंड प्रमाणात माहिती टाकली जाणार आहे. भारत हा एक अब्जाहून अधिक बायोमेट्रिक माहितीचे संकलन करणारा जगातील एकमेव देश ठरला आहे.
२९ वस्तूंवरील जीएसटी माफ -Maharashtra Times
जीएसटी परिषदेच्या आजच्या बैठकीत २९ हस्तकला उत्पादनांवरील (हँडीक्राफ्ट्स) जीएसटी संपुष्टात आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय अन्य ४९ वस्तूंवरील जीएसटीतही कपात करण्यात आली असून याबाबत उत्तराखंडचे अर्थ मंत्री प्रकाश पंत यांनी पत्रकारांना माहिती दिली. वस्तू आणि सेवा कर परिषदेची २४वी बैठक आज पार पडली. या बैठकीत २९ वस्तूंवरील जीएसटी संपुष्टात आणण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे जीएसटी परिषदेचे सदस्य प्रकाश पंत यांनी सांगितले. जीएसटी भरणा प्रक्रिया अधिक सुलभ करण्याबाबत आजच्या बैठकीत कोणताही निर्णय होऊ शकला नाही.
सेन्सेक्‍स, निफ्टीचा पुन्हा उच्चांक
मुंबई - रिलायन्स समूहाचे मुकेश अंबानी यांची पश्‍चिम बंगालमध्ये पाच हजार कोटींच्या गुंतवणुकीची घोषणा, तसेच इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू हे भारत दौऱ्यावर असून, त्यांच्या या दौऱ्यादरम्यान होणारे करार या सर्वांचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारावर होऊन सेन्सेक्‍स, निफ्टीने पुन्हा ऐतिहासिक कामगिरीचा पल्ला सर केला. सेन्सेक्‍सने विक्रमी ३५ हजारांचा टप्पा ओलांडला, तर निफ्टीनेही नवा उच्चांक प्रस्थापित केला. दिवसअखेर सेन्सेक्‍स ३१० अंशांच्या वाढीसह ३५,०८१.८१ अंशांवर स्थिरावला, तर निफ्टीही ८८.१० अंशांनी वधारून १०,७८८.५५ अंशांवर बंद झाला.
दूरसंचार क्षेत्रात ५० हजार नोकऱ्या जाणार -Maharashtra Times
कधीकाळी रोजगारनिर्मितीत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या दूरसंचार क्षेत्राला लागलेली ओहोटी पुढील सहा महिन्यांतही कायम राहणार आहे. या क्षेत्राने आतापर्यंत ४० हजार रोजगार गमावले असून येत्या सहा महिन्यांत आणखी ५० हजार नोकऱ्या जाणार असल्याची भीती सीआयईएल एचआर सर्व्हिसेसच्या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. दूरसंचार क्षेत्राला सध्या मोठ्या प्रमाणावर तोटा सहन करावा लागत आहे. सातत्याने वाढणारी स्पर्धा, कायद्यांमध्ये झालेली सुधारणा, जीएसटी, नोटाबंदी, विलिनीकरणे व अधिग्रहणे या सगळ्याचा परिणाम म्हणून या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर नोकरकपात सुरू आहे. या नोकरकपातीचा दर येत्या दोन ते तीन तिमाहींमध्येही कायम राहणार आहे.
आता व्हॉट्सअॅपद्वारेही पाठवता येणार पैसे! -Maharashtra Times
भारतात 'कॅशलेस' धोरण जोरदार सुरू असताना 'डिजिटल पेमेंट्स'ची सुविधा देण्यासाठी आता व्हॉट्सअॅपही सज्ज झालंय. लवकरच हे अॅप आपलं 'पेमेंट' फिचर सुरू करणार असून त्याद्वारे आपल्या जवळच्या व्यक्तिंना पैसे पाठविणं अगदीच सोपं होईल. ​ व्हॉट्सअॅप फेब्रुवारीपर्यंत ही सुविधा सुरू करण्याची शक्यता आहे. मॅसेजिंग अॅप म्हणून देशात मोठ्या प्रमाणात वापरलं जाणारं व्हॉट्सअॅप 'युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI)'वर आधारित आपली पेमेंट सुविधा स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि अॅक्सिस बँक या बँकांच्या सहकार्याने सुरू करणार आहे.
इंधनबचतीसाठी भारत पेट्रोलियमची मोहीम
पर्यावरणपूरक इंधनवापराला प्रोत्साहन देण्यासाठी 'भारत पेट्रोलियम'ने संरक्षणक्षमता महोत्सव, (सक्षम) ही मोहीम हाती घेतली आहे. १६ जानेवारी ते १५ फेब्रुवारीदरम्यान देशभरात ही मोहीम राबवली जाणार आहे. पर्यावरणातील कार्बन उत्सर्जन प्रमाण कमी करणे, पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी प्रत्येक राज्यामध्ये राज्य सरकारकडून या मोहिमेबाबत जनजागृती केली जाणार आहे. नुकताच राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थित भारत पेट्रोलियमच्या या मोहिमेचा शुभारंभ झाला.
आयडीबीआयच्या जैन यांना बेस्ट सीईओ पुरस्कार
मुंबई - बिझनेस टूडेच्या बेस्ट सीईओ स्टडी २०१७ या सार्वजनिक बॅंकांच्या (पीएसयू) श्रेणीतील उत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पुरस्कार आयडीबीआयचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) व सीईओ महेशकुमार जैन यांना प्रदान करण्यात आला. जैन यांना देशभरातील चार प्रमुख बॅंकांमध्ये दशकभरापासून काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. ते ३ एप्रिल २०१७ पासून आयडीबीआयमध्ये एमडी व सीईओपदी कार्यरत आहेत.

Want to stay updated ?

x

Download our Android app and stay updated with the latest happenings!!!


50K+ people are using this