facebook pixel
chevron_right Entertainment
transparent
सोनाली बेंद्रेची लव्हस्टोरी तुम्हाला माहित आहे का?
बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिला कॅन्सर असल्याचं काही दिवसांपूर्वीच उघड झालं. आणि तिच्या चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला. सध्या सोनाली बेंद्रे तिच्या आजारावर न्यूयॉर्कमध्ये उपचार घेतल आहे. या कठिण प्रसंगी तिचा नवरा गोल्डी बहल तिच्यासोबत खंबीरपणे उभा आहे. सोनालीने सोशल मीडियावर तिचा न्यू हेअर कटसोबतचा फोटो शेअर केला. ज्यामध्ये ती अतिशय भावुक दिसली आणि त्या फोटोत गोल्डी तिला शांत करत होता. पण एकेकाळी अशी परिस्थिती होती की, सोनाली गोल्डीला बघणं देखील पसंद करत नसे. जाणून घेऊया सोनालीची लव्हस्टोरी.
ZEE 5 वर लाँच झाली सनी लिओनीची गोष्ट...
बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीच्या प्रोफेशनल लाइफ ते अगदी पर्सनल लाईफपर्यंतच्या सगळ्या खास गोष्टी सनीच्या बायोपिकमध्ये पाहायला मिळणार आहे. सनीचं आयुष्य हे खूप खडतर आहे. या बायोपिकचा प्रवास खूप वेगळा आणि हटके होता. हाच प्रवास सनीने आपल्या 'करणजीत कौर द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी' या वेब सिरीजमधून मांडला आहे. ही वेब सिरीज zee 5 वर प्रसारित करण्यात आली आहे. बहुदा हा पहिला प्रयत्न आहे जिथे कलाकार स्वतः आपल्या बायोपिकमध्ये काम करत आहे. सनी म्हणते की, या वेब सिरीजमध्ये माझ्या आयुष्यातील सगळ्या पैलू मांडल्या आहेत.
मनीषा कोईराला लवकरच वेब सीरीजमध्ये
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली संजू चित्रपटात नर्गिस यांची भूमिका केल्यानंतर अभिनेत्री मनीषा कोईराला लवकरच एका हेरगिरीवर आधारित वेब सीरीजमध्ये दिसणार आहे. एप्लॉस एन्टरटेंटमेंटचे संस्थापक समीर नायर 'क्राईम थ्रिलर आयविटनेस' (२०१६) ही अमेरिकन वेबसीरिज हिंदीत आणणार आहेत. यात मनीषा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. समीर यांनी मनीषाला वेब सीरिजमधील मुख्य भूमिकेसाठी विचारलं होत. मनीषाला ही कथानकही आवडलं आणि त्यातील तिची भूमिकाही. त्यानंतर या प्रोजेक्टवर चर्चा करण्यासाठी समीरबरोबर तिची अनेकवेळा मिटींगही झाली. पण त्यातून फारसं काही निष्प्पण होत नव्हतं. पण आता मनीषाच ही भूमिका करणार असल्याचं ठरलय.
…म्हणून आनंदशी लग्न केले, दोन महिन्यानंतर सोनम कपूरचा खुलासा
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली बॉलिवूडची स्टाईल आयकॉन सोनम कपूर हिने दोन महिन्यांपूर्वी तिचा बॉयफ्रेंड आनंद आहूजा याच्यासोबत सात फेरे घेतले. आता दोन महिन्यानंतर स्वत: सोनम कपूर हिने ट्विटर अकाऊंटवर व्हिडीओ शेअर करून आनंद आहूजासोबत लग्न का केले याचा खुलासा केला आहे. सोनम कपूरने 'वोग इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये आपल्या फॅशन प्रेमाबद्दल सांगितले होते. मी फॅशनवर जीतके प्रेम करते तेवढे कोणीच करत नाही असे तिने म्हटले होते.
परश्या अर्थात आकाश ठोसरचा फिटनेस फंडा
नवोदीत अभिनेता आकाश ठोसर अल्पावधित लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलाय. मराठी सिनेमातून चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले. मात्र, त्याला बॉलिवूडमधूनही मागणी होत आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' या चित्रपटात रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर ही जोडी पुढे आली. सैराटमध्ये आकाश ठोसरने परश्याची भूमिका साकारली होती. त्याने अभियाने छाप पाडली. आता तो आपल्या फिटनेसकडे लक्ष देत आहे. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याचा फिटनेस फंडा पाहिला तर तो आगामी कोणत्या सिनेमासाठी तयारी करीत आहे, याची उत्सुकता शिगेला पोहोचलेय.
माझ्या नवऱ्याची बायको : गुरू राधिकासमोर गुडघे टेकणार का?
झी मराठीवरील माझ्या नवऱ्याची बायको ही कायमच प्रेक्षकांच्या पसंतीची मालिका आहे. या मालिकेत दिवसेंदिवस ट्विस्ट पाहायला मिळत आहे. गुरूच्या कंपनीवर केस दाखल झाल्यामुळे सध्या सगळीकडून त्याला ऐकून घ्यावं लागत आहे. जीवन कंपनीच्या मालकांना भेटण्यासाठी स्वतः गुरू जातो. त्यांची माफी मागून त्यांना आपल्या कंपनीसोबत केलेला करार सुरू ठेवण्यास सांगतो. मात्र जीवन कंपनीच्या मालकांनी राधिका मसाले खूप चांगल काम करत असल्याचं सांगत तुम्ही त्यांची माफी मागून राधिका मसालेची मदत घ्या असं सांगितलं.
'सविता दामोदर परांजपे' तुमच्या भेटीला लवकरच
स्वप्ना वाघमारे -जोशी दिग्दर्शित 'सविता दामोदर परांजपे' हा चित्रपट येत्या ३१ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वी या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरु असून या चित्रपटाचा ट्रेलर लवकरच प्रदर्शित होणार असल्याची माहिती अभिनेता जॉन अब्राहमने त्याच्या ट्विटर हॅण्डलवरुन दिली आहे. एन्टरटेन्मेंट' आणि 'पॅनोरमा स्टुडिओज'ची प्रस्तुती असलेल्या 'सविता दामोदर परांजपे' या चित्रपटाची निर्मिती जॅान अब्राहमने केली असून तो या चित्रपटासाठी प्रचंड उत्सुक असल्याचं दिसून येतंय. याच उत्सुकतेपोटी त्याने त्याच्या ट्विटर हँण्डलवरुन चित्रपटाच्या ट्रेलर लवकरच प्रदर्शित होणार असल्याचं सांगितलं.
'प्रेमात पडण्याची मला अजिबात घाई नाही'
'प्रेम व्हायचं तेव्हा होईल. आता मात्र मला प्रेमात पडण्याची अजिबात घाई नाही' असं मत नुकतच प्रेमभंग झालेल्या कतरिनानं व्यक्त केलं आहे. कतरिना आणि रणबीर कपूर ही बॉलिवूडमधली जोडी साधरण वर्षभरापूर्वी विभक्त झाली. या दोघांचं ब्रेकअप होण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत होत्या मात्र कतरिनानं त्या कधीही पुढे येऊ दिल्या नाही. नुकताच कतरिनानं इंग्लडमध्ये तिचा वाढदिवस साजरा केला. जेव्हा कतरिनाला प्रेमाबद्दल विचारलं तेव्हा मात्र तिनं प्रेमात पडण्याची कोणतीही घाई नसल्याचं तिनं स्पष्ट केलं. प्रेमभंग झाल्यानंतर स्वत:साठी पूर्णवेळ देण्याचा निर्णय तिनं घेतला आहे.
रिटा भादुरी यांच्या निधनामुळे जुहीची 'ही' इच्छा राहिली अपूर्ण
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय ठरलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री रिटा भादुरी यांचं आज अल्पशा आजाराने निधन झालं. त्यांच्या निधनामुळे सध्या कलाविश्वात शोककळा पसरली असून त्यांच्या सारखी गुणी अभिनेत्री गमावल्याचं दु:ख चाहत्यांमध्ये दिसून येत आहे. विशेष म्हणजे रिटा यांच्या निधनामुळे छोट्या पडद्यावरील अभिनेत्री जुही परमार हिला प्रचंड धक्का बसला असून तिची एक इच्छा अपूर्ण राहिल्याचं नुकतंच तिने म्हटलं आहे. रिटा भादुरी या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांना मूत्रपिंडाची समस्या असल्यामुळे डायलिसिसवर ठेवण्यात आले होते.
'लैला मजनू'वरून इम्तियाज- एकतामध्ये मतभेद?
निर्माती एकता कपूर 'लैला मजनू'ची ऐतिहासिक प्रेमकहाणी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर आणण्याच्या तयारीत आहे. हा चित्रपट दिग्दर्शक इम्तियाज अली सादर करणार आहे. साजिद अली दिग्दर्शित या चित्रपटात काश्मीरमधल्या हिंदू- मुस्लीम जोडप्याची प्रेमकथा दाखवण्यात येणार आहे. 'मिड डे'नं दिलेल्या वृत्तानुसार या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठीच्या प्लॅनवरून इम्तियाज आणि एकता यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत. चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी इम्तियाजच्या कल्पना वेगळ्या असल्याने एकताला त्या रुचत नसल्याचं समजतंय. त्याचप्रमाणे प्रमोशनची जबाबदारी एका नावाजलेल्या पीआर कंपनीकडे सोपवण्याचं एकताचं मत आहे तर याउलट इम्तियाजला एखाद्या सर्वसामान्य कंपनीकडून हे काम करून घ्यायचं आहे.
'ही' ठरली डॉ.हाथी यांची अखेरची आठवण
छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरलेली मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील डॉ. हाथी अर्थात अभिनेता कवी कुमार आझाद यांनी काही दिवसापूर्वी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या अशा अचानक जाण्यामुळे चित्रपटसृष्टीबरोबरच त्यांच्या चाहत्यांना प्रचंड धक्का बसला होता. मुळात डॉ.हाथी यापुढे परत कधीच दिसणार नाही या एकाच कल्पनेने चाहत्यांच्या डोळ्यांच्या कडा आपोआप पाणावल्या. मात्र कवी कुमार आझाद यांच्या निधनानंतरही ते काही काळ प्रेक्षकांच्या भेटीला येतील असं दिसून येत आहे. 'तारक मेहता'मधील अभिनेत्री मुनमुन दत्तने एक पोस्ट शेअर केली असून यात डॉ.हाथी यांचा अखेरच्या सीनचा फोटो आहे.
शाही कुटुंबात तणावाखाली वावरतेय मेगन, वडिलांनी व्यक्त केली चिंता
मेगन मार्केलच्या लग्नाला अवघे दोन महिनेही पूर्ण होत नाही तोच तिच्या वडिलांनी तिच्या वैवाहिक जीवनाविषयी चिंता व्यक्त करायला सुरूवात केली आहे. मेगन आणि प्रिन्स हॅरी यांचा विवाहसोहळा मे महिन्यात पार पडला. एखाद्या परिकथेप्रमाणे या दोघांचा शाही विवाहसोहळा थाटामाटात झाला. मेगन अमेरिकन अभिनेत्री म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे, तर प्रिन्स हॅरी ब्रिटन राजघराण्याचे सुपुत्र. मात्र आता मेगनच्या वैवाहिक जीवनाविषयी तिचे वडिल थॉमस मार्कल यांनी चिंता व्यक्त करायला सुरूवात केली आहे. ती सध्या खूपच घाबरलेली असते, मला तिच्या डोळ्यांतून हे दिसतं.
अक्षय कुमारने 'या' गोष्टीत सलमान खानला टाकलं मागे
अखेर फोर्ब्सची यादी जाहिर झाली आहे. यामध्ये सर्वाधिक मेहनत करणाऱ्या कलाकारांची नावे जाहीर झाली आहेत. या लिस्टमध्ये बॉलिवूडच्या सगळ्या खान्सना मागे टाकत एका अभिनेत्याने सर्वात पहिलं स्थान मिळवलं आहे. अक्षय कुमार या कलाकाराने फोर्ब्सच्या यादीत नंबर पटकावला आहे. सलमान खान कमाईच्या बाबतीत अक्षय कुमारच्या मागे आहे. मात्र सर्वाधिक धक्कादायक बाब ही आहे की, यामध्ये दरवर्षी ज्या कलाकाराच नाव असतं यंदा त्या कलाकाराचं नाव नाही. हा कलाकार आहे शाहरूख खान. यंदा फोर्ब्सच्या यादीत शाहरूख खानचा सहभाग नाही.
'या' खास कारणासाठी मेलबर्नमध्ये राणी मुखर्जी फडकवणार तिरंगा
मुंबई, 17 जुलैः ऑगस्ट 2018 मध्ये मेलबर्न चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात राणी मुखर्जीला प्रमुख पाहुणी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या परंपरेनुसार ज्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात येते त्यांना त्यांच्या देशाचा झेंडा फडकवण्याची संधी मिळते. तसेच राणी मुखर्जीला आयएफएफएम पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी नामांकन देण्यात आले आहे. याबद्दल बोलताना राणी म्हणाली की, भारताचा झेंडा फडकवायला मिळणं ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. पण आपल्या देशाचा तिरंगा जर परदेशात फडकवायचे भाग्य लाभत असेल तर त्याहून आनंदाची गोष्ट कोणतीच नाही.
आई-मुलीच्या नात्यातील कंगोरे मांडणारा 'बोगदा' लवकरच
नितीन केणी यांची प्रस्तुती असलेला 'बोगदा' हा सिनेमा येत्या ७ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आई आणि मुलीच्या नात्यातील कंगोरे मांडणाऱ्या या सिनेमाचे पोस्टर नुकतेच सोशल नेट्वर्किंग साईटवर लाँँच करण्यात आले. निशिता केणी लिखित आणि दिग्दर्शित या सिनेमात अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांची प्रमुख भूमिका आहे. मायलेकीच्या नात्यामधील विविध पैलू मांडणाऱ्या या सिनेमाचे पटकथा आणि संवादलेखन दिग्दर्शिका निशिका केणी यांनीच केले आहे. स्त्री व्यक्तिरेखेवर आधारित असलेल्या या सिनेमाबद्दल बोलताना त्या सांगतात की, ' स्त्रीप्रधान भूमिकेवर मराठीत कमी सिनेमे बनले आहेत.
परश्याचं जिम ट्रेनिंग पाहिलं?
नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' या चित्रपटातून दोन नवे चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला आले. ते चेहरे म्हणजे रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर. या दोन्ही नवोदित कलाकारांनी साकारलेल्या 'आर्ची' आणि 'परश्या' या पात्रांनी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. खेड्यापाड्यापासून ते शहरापर्यंत, इतकत नव्हे तर परदेशातही या कालाकारांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. या चित्रपटानंतर रिंकूने शिक्षणावर लक्ष केंद्रीत केलं, तर आकाशने कलाविश्वातच करिअर करण्याच्या दिशेने वाटचाल सुरु केली. आकाशच्या लोकप्रियतेतही दर दिवसागणिक वाढ होत गेली. मुख्य म्हणजे तुलनेने त्याच्या चाहत्यांमध्ये फिमेल फॅन फॉलोअर्सचा आकडा जास्त असल्याचं लगेचच लक्षात येत आहे.
अखेर प्रियांकाच्या लग्नाबद्दल बोलली तिची आई
मुंबई, 17 जुलैः सध्या बॉलिवूडची देसी गर्ल तिच्या सिनेमांपेक्षा खासगी कारणांमुळे चर्चेत आहे. प्रियांका अमेरिकन गायक निक जोंसला डेट करत आहे. नुकताच तिने काही दिवसांचा भारत दौरा केला. या दौऱ्यात तिच्यासोबत निकही दिसला. दोघंही गोव्यात काही दिवस सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसले. त्यामुळे लवकरच हे दोघं लग्नबंधनात अडकणार का असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे. आतापर्यंत प्रियांकाने तिच्या नात्याबद्दल कोणताही खुलासा केलेला नाही. पण एका पत्रकार परिषदेत प्रियांकाची आई मधू चोप्रा यांना मुलीच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारला असता, त्यांना सुरूवातीला प्रसारमाध्यमांच्या या प्रश्नाचा राग आला.
पुण्याची मराठमोळी अपूर्वा झळकणार बॉलिवूडमध्ये
सामना ऑनलाईन । मुंबई. गेल्या काही दिवसात मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेत्री बॉलिवूडमध्येही आपली झलक दाखवताना दिसत आहेत. त्यापैकी एक नवोदित अभिनेत्री अपूर्वा कवडे हीनेही बॉलिवूडमध्ये पदार्पण केले असून एक अनलिमिटेड- दि मर्डर मिस्ट्री या चित्रपटात ती प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. पुण्यातील जुन्नर तालुक्यातील अपूर्वा कवडे हिने याआधी बऱ्याच शॉर्टफिल्म केलेल्या आहेत. अभिनयाचा पहिला ब्रेक तिला शॉर्ट फिल्मद्वारे मिळाला होता. त्याचप्रमाणे इंटरनॅशनल पंजाबी म्युझिक अल्बमध्येही तिने काम केलेले आहे. हा अल्बम जगभर प्रदर्शित झाला आहे.
'दिलबर' फेम नोरा फतेहीला सलमानची लॉटरी
अप्रतिम बेली डान्स आणि आपल्या अदांनी घायाळ करणारी अभिनेत्री नोरा फतेही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. यामागचं कारण म्हणजे 'सत्यमेव जयते' या चित्रपटातील 'दिलबर' हे गाणं. सुष्मिता सेन आणि संजय कपूर यांच्यावर चित्रीत झालेल्या 'दिलबर' या मूळ गाण्याचं हे रिक्रिएटेज व्हर्जन होतं. या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला असून अत्यंत कमी कालावधीत युट्यूबवर त्याला १० कोटी व्ह्यूज मिळाले आहेत. या प्रसिद्धीमुळेच नोराला आता थेट बॉलिवूडच्या 'सुलतान'ची म्हणजेच सलमान खानची ऑफर मिळाली आहे. त्याच्या आगामी चित्रपटात नोरा झळकणार आहे.

Want to stay updated ?

x

Download our Android app and stay updated with the latest happenings!!!


90K+ people are using this