facebook pixel
chevron_right Health
transparent
आता घरीच कळणार गर्भातील बाळाची अवस्था
गर्भावस्थेत बाळाची हालचाल आणि तब्बेत जाणून घेणं ही प्रत्येक आईची तळमळ असते. गर्भावस्थेत बाळाची हालचाल जाणून घेण्यासाठी प्रत्येकवेळी आईला डॉक्टरांवर अवलंबून रहावं लागतं. अनेकदा गर्भावस्थेत महिलेला बाळाचा हालचाल न झालेली किंवा गर्भावस्थेतच बाळ दगावलं तरी त्याची जाणीव होत नाही. अशावेळी या महिलेला तिच्या गर्भातील गर्भाची माहिती मिळावी अशी सोय झाली आहे. आजा जन्माला न आलेल्या बाळाची तब्बेत किंवा स्वास्थ डॉक्टरकडे न जाता समजू शकणार आहे.
टाटा मोटर्सची गाडी घ्या, iPhone X मोफत मिळवा
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सध्या सर्वच कंपन्या विविध ऑफर्स जाहीर करत असल्याचे दिसते. आपले उत्पादन विकले जावे यासाठीच हा खटाटोप केलेला असतो. सणासुदीच्या काळात तर या ऑफर्सची लयलूटच होते. टाटा मोटर्सने नुकतीच एक 'फेस्टिव्हल ऑफ गिफ्ट' नावाची एक डिस्काउंट स्कीम लाँच केली आहे. ज्याद्वारे ग्राहकांना एकाहून एक आकर्षक अशा भेटवस्तू देणार असल्याचे जाहीर केले आहे. हेक्सा, नेक्झॉन, सफारी स्टॉर्म, टियागो, झेस्ट, टिगॉर या कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांना खास भेटवस्तू दिल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे या ऑफर्समध्ये गाडीच्या किमतीवरही सूट दिली जाणार आहे.
'या' तेलांच्या वापराने करा केसांच्या तक्रारी दूर
महिलांचे सौंदर्य हे त्यांच्या केसात असते असे म्हणतात. पण त्यासाठी हे केस तितके छान असणे आवश्यक आहे. केस हा प्रत्येक महिलेसाठी अतिशय जिव्हाळ्याचा विषय. आपले केस जाड, लांब आणि काळेभोर असावेत अशी प्रत्येक स्त्रीची इच्छा असते. पण सध्याच्या जीवनशैलीमुळे केसांचा पोत खराब होतो आणि मग नेमके काय करावे हे कळत नाही. यावर उपाय म्हणून महिला कधी पार्लरचा मार्ग धरतात तर कधी बाजारातील महागडी उत्पादने वापरतात.
टुथब्रशच्या वापराने करु शकता या पाच गोष्टी
टुथब्रश वापराबद्दल आपण अनेकदा ऐकलं असेल. जसं की, टुथब्रश कधीच ओला करु नये. असे केल्याचे टुथब्रशचा दातांवर होणारा परिणाम कमी होतो. ब्रश ओला करण्याची सवय असल्यास तो अगदी हलकासा ओला करावा. पण पूर्णपणे ओला करु नये. ब्रश ओला केल्याने टुथपेस्ट काहीशी पातळ होते. खूप पातळ टुथपेस्टमुळे ब्रशिंगची क्षमता कमी होते आणि ते दातांच्या आरोग्यासाठी चांगले देखील नसते.​आतापर्यंत तुम्ही दातांच्या स्वच्छतेसाठी टुथब्रशचा उपयोग होतो हे ऐकला असाल. पण याचा उपयोग अनेक घरगुती कारणांसाठीही केला जाऊ शकतो. त्यामुळे वापर झाल्यावर टुथब्रश फेकून देऊ नका.
Xiaomi Diwali Sale : स्मार्टफोनसोबत इतर उपकरणांवरही मिळणार बंपर सूट
दिवाळी म्हणजे आनंदाची उधळण आणि खरेदीची लयलूट. हीच गोष्ट लक्षात घेऊन शाओमी कंपनीने नुकताच आपला सेल जाहीर केला आहे. मूळ चीनची असणाऱ्या या कंपनीने भारतात कमी काळात पसंती मिळवली. त्याचाच फायदा घेऊन कंपनी आपले सेल जाहीर करते. आता दिवाळीच्या निमित्ताने कंपनीने आपला हा धमाकेदार सेल लाँच केला असून तो २३ ऑक्टोबरला ते २५ ऑक्टोबर या कालावधीत सुरु राहणार आहे. यामध्ये ग्राहकांना स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही, हेडफोन्स, पॉवर बँक आणि इतरही काही उपकरणांवर सूट मिळणार आहे.
देशात यंदा डेंग्यूचे आतापर्यंत ८० बळी
४० हजार जणांना लागण झाल्याची आरोग्य विभागाची माहिती या वर्षी देशभरात डेंग्यूमुळे ८० जणांचा मृत्यू ओढवला असून सप्टेंबपर्यंत ४० हजार जणांना त्याची लागण झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने जाहीर केली आहे. केंद्रीय आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय कीटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत (एनव्हीबीडीसीपी) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार यंदा ३० सप्टेंबपर्यंत देशात डेंग्यूमुळे ८३ जणांचा मृत्यू झाला, तर ४० हजार ८६८ जणांना त्याची लागण झाली.
ग्लोबल वॉर्मिंगमुळे जगभरामध्ये जाणवणार बिअरचा तुटवडा
जगभरात मद्य सेवन करणाऱ्यांमध्ये लोकप्रिय असणारी बिअर हे सर्वाधिक सेवन केले जाणारे मद्य आहे. मात्र ग्लोबल वॉर्मिंगमुळे होणाऱ्या वातावरणांमधील बदलांमुळे बिअर ज्यापासून बनवली जाते त्या बार्लीच्या पिकाचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे. थोडक्यात सांगाचे झाले तर वातवरणातील बदलांमुळे भविष्यात जगभरामध्ये बिअरचा तुटवडा जाणवू शकतो असं अभ्यासकांच म्हणणं आहे. बार्लीचे उत्पनावर दुष्काळ आणि उष्णतेमुळे मोठा परिणाम होतो. त्यामुळे उत्पन्न कमी होण्याची शक्यता वाढते. ब्रिटनमधील नेचर प्लॅण्ट्स या वैज्ञानिक जर्नलमधील एका संशोधनातील अहवालामध्ये बिअर तुटवड्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
कर्करोगाचे अतिनिदान रुग्णांच्या मुळावर
बॉन्ड विद्यापीठातील संशोधकांचा दावा HOT DEALS. सध्या रुग्णांचे अतिनिदान म्हणजे ओव्हर डायग्नोज होण्याचे प्रमाण वाढले असून जो रोग किंवा व्याधी कधीही होऊ शकणार नाही, त्याचे उपचार केल्याने आयुष्यभरासाठी प्रकृतीच्या तक्रारी उद्भवत असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. बॉन्ड विद्यापीठाचे पुरावा आधारित औषध विभागाचे प्रो. पॉल ग्लासझिव्ह्यू यांनी याबाबत न्यूज जीपीला सांगितले की, प्रामुख्याने कर्करोगाचे अतिनिदान होण्याने ही समस्या निर्माण झाली आहे. तुम्हाला आयुष्यात जो विकार होऊ शकणार नाही, त्याचे निदान जाहीर करणे म्हणजे अतिनिदान होय, असे त्यांनी सांगितले.
...म्हणून झोपण्यासाठी अंथरुणावर लवकर जावं
तुम्ही जर कोणत्या कामात अपयशी ठरत असाल तर झोप या मागचं एक कारण असू शकतं. तुम्ही जर वेळेवर झोपत नसाल आणि पूर्ण झोप घेत नसाल तर याचे अनेक दुष्परिणाम तुमच्यावर होतात. जाणून घ्या का वेळेवर झोपलं पाहिजे. लक्षात ठेवा जेव्हा आई तुम्हाला सांगते की सकाळी सर्व ठीक होईल? तेव्हा ती बरोबर असते ! जे उशिरा झोपतात त्यांच्यामध्ये नकारात्मकता जास्त येते. जेव्हा या बाबत अभ्यास केला गेला तेव्हा त्याच्या निष्कर्षांवरून असे दिसून आले आहे की झोपेच्या व्यत्ययामुळे निराशावादी विचार येतात.
जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर या ६ गोष्टी करा
तुम्हाला जर तुमच्या जीवनात काही तरी मिळवायचं असेल आणि यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला खाली दिलेल्या 6 गोष्टी केल्या पाहिजेत. प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या जीवनात या 6 गोष्टी दिसतात. ज्यामुळे ते आज यशस्वी झाले आहेत. जाणून घ्या त्या 6 गोष्टी कोणत्या आहेत. तुम्ही कामावरुन घरी गेल्यानंतर काय करता ? टीव्ही पाहता, सोशल मीडियावर मित्रांसोबत चॅट करता किंवा मग पार्टी करण्यासाठी जाता. पण तुम्हाला मिळालेल्या रिकाम्या वेळेचा वापर जर तुम्ही योग्य पद्धतीने केला तर तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही.
तुमच्यासोबत आता व्हॉट्स अॅपही सुट्टीवर जाणार, 'व्हेकेशन मोड' लवकरच येणार
फेसबुकच्या मालकीचे असणारे जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अॅप म्हणून ओळखले जाणारे व्हॉटस अॅप लवकरच एक नवीन फिचर लॉन्च करणार आहे. या नवीन फिचरमुळे सुट्टीवर असताना व्हॉट्स अप वापरणे अधिक सोयीस्कर होणार आहे. कंपनी आपल्या बीटा व्हर्जनवर 'व्हेकेशन मोड' या नवीन फिचरची चाचणी करत असल्याची माहिती व्हॉट्स अॅपच्या बीटा व्हर्जनसंदर्भात बातम्या देण्याऱ्या 'डब्यूएबीटाइन्फो' या वेबसाईटने सांगितले आहे. वर्षभरामध्ये अनेक नवीन नवीन फिचर्स लॉन्च करणाऱ्या व्हॉट्स अपने मागील काही महिन्यांपासून या 'व्हेकेशन मोड' फिचरवर काम करत आहे.
व्होडाफोन ९९ आणि १०९ रुपयांच्या प्लॅनमध्ये देणार या सुविधा
जिओने बाजारात दमदार प्रवेश केल्यानंतर एअरटेल, आयडीया आणि व्होडाफोनसारख्या कंपन्यांचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे या कंपन्या काही ना काही निमित्त काढून आपल्या आकर्षक ऑफर्स काढताना दिसतात. दसरा आणि दिवाळीच्या निमित्ताने व्होडाफोनने नुकताच एक आकर्षक प्लॅन जाहीर केला आहे. जे लोक इंटरनेटपेक्षा कॉलिंग आणि मेसेजिंगसाठी फोनचा जास्त वापर करतात त्या ग्राहकांसाठी कंपनीने नवीन प्लॅन लाँच केला आहे. प्रीपेड ग्राहकांसाठी कंपनीने ९९ आणि १०९ रुपयांचे दोन खास प्लॅन्स आणले आहेत. दोन्हीही प्लॅनची व्हॅलिडीटी २८ दिवसांची आहे. १०९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलिंग मिळणार आहे.
मार्क झकरबर्गला अध्यक्षपदावरुन हटवा; कंपनीच्या गुंतवणूकदारांची मागणी
फेसबुक या सोशल मीडिया माध्यमाचा अध्यक्ष असलेल्या मार्क झकरबर्गला हटविण्यात यावे अशी मागणी कंपनीच्या गुंतवणूकदारांनी केली आहे. मागील काही दिवसांपासून फेसबुकचा डेटा हॅक होत असल्याच्या घटना जोर धरत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही मागणी होत आहे. इलियॉनिस, ऱ्होड आयलंड, पेन्सिवेनिया आणि न्यू यॉर्क सिटी कंट्रोलर स्कॉट स्ट्रींगर यांनी मिळून कंपनीकडे हा प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावाला मोठमोठ्या अॅसेट मॅनेजरचे समर्थन मिळेल असा या गुंतवणूकदारांचा अंदाज आहे. असे असले तरीही सध्या फेसबुकचे सर्वाधिक शेअर्स झकरबर्ग याच्याकडेच आहेत.
जय महाराष्ट्र: जाणून घ्या सांबारचं संभाजी महाराज कनेक्शन
दाक्षिणात्य खाद्यसंस्कृतीमधील अविभाज्य भाग असलेला खाद्यपदार्थ म्हणजे सांबार. इडली, डोसा, मेदूवडा या पदार्थांची नावं घेतली की सांबाराची आपोआपच डोळ्यासमोर येते. केवळ दक्षिणेतील लोकांच नाही तर जगभरातील खवय्यांना आपल्या चवीची भूरळ पाडणाऱ्या या सांबाराची ओळख जरी दाक्षिणात्य पदार्थ असली तरी या पदार्थाचा जन्म महाराष्ट्रात झाला आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शिवाजी महाराजांचे बंधू व्यंकोजी राजे यांचे वंशज असणाऱ्या शहाजी राजांचे चुलत बंधू संभाजी राजेंच्या नावावरून या पदार्थाचे नाव पडल्याचे लेखी पुरावेही आहेत.
जाणून घ्या दसऱ्याचे महत्त्व…
'दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा' असं म्हणत विजयादशमीचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नवरात्राचा शेवटचा दिवस म्हणजे दसरा. ९ दिवस अधिष्ठान केलेल्या देवीने महिषासूर राक्षसाचा या दिवशी वध केला असे म्हटले जाते. तसेच रामानेही याच दिवशी रावणाचा वध केल्याने या सणाला विजयादशमी असेही म्हटले जाते. रावणाचे दहन म्हणजेच वाईट वृत्तींचे दहन या दिवशी करावे असे मानले जाते. या दिवशी घरोघरी पूजा-अर्चा करुन शस्त्रांची, लक्ष्मीची आणि घरातील वाहनांची मनोभावे पूजा केली जाते. झेंडूची फुले आणि आंब्याची पाने यांना आजच्या दिवशी विशेष महत्त्व आहे.
बाइक खरेदी करा आणि मिळवा इटलीची ट्रीप, Ducati ची बंपर ऑफर
ख्यातनाम मोटारसायकल कंपनी Ducati ने सणासुदीचा काळ लक्षात घेऊन भारतीय ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी धमाकेदार ऑफर आणली आहे. मर्यादित कालावधीसाठी ही ऑफर असणार आहे. डुकाटीच्या Scrambler 800, Multistrada आणि Diavel range मॉडल्सवर ही ऑफर मिळणार आहे. दिल्ली-एनसीआर, बंगळुरु, पुणे, मुंबई, अहमदाबाद, कोच्ची, कोलकाता आणि चेन्नई येथील सर्व डिलर्सकडे ही ऑफर उपलब्ध आहे. Ducati ने एक्शन कॅमेरा बनवणारी कंपनी GoPro सोबत भागीदारी केली आहे. यामध्ये Ducati च्या Scrambler 800 रेंजमधील कोणतही मॉडल खरेदी केल्यास ग्राहकांना GoPro Hero कॅमेरा मोफत मिळेल.
७८ रुपयांत BSNL देणार या धमाकेदार सुविधा
BSNL ने आपल्या ग्राहकांना कमी रुपयांमध्ये आकर्षक प्लॅन देण्याचा धमाका मागच्या काही दिवसांपासून लावला आहे. सरकारी भागीदारी असलेल्या या कंपनीने नुकताच आपला ७८ रुपयांचा एक प्लॅन जाहीर केला आहे. दसरा आणि दिवाळीच्या मुहूर्तावर कंपनीने आपल्या ग्राहकांना खुश करायचे ठरवले असल्याने हा प्लॅन लाँच केला आहे. यामध्ये ग्राहकांना रोज २ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे. या प्लॅनची व्हॅलिडीटी १० दिवसांची असल्याचेही कंपनीने सांगितले आहे. म्हणजेच कंपनीकडून एकूण २० जीबी डेटा दिला जाणार आहे.
Lenovo ने लॉन्च केले 2 दमदार बजेट स्मार्टफोन
जवळपास वर्षभरानंतर स्मार्टफोन निर्माती कंपनी लिनोवोने (Lenovo)दोन नवे स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च केले आहेत. Lenovo K9 आणि Lenovo A5 हे स्मार्टफोन कंपनीने लॉन्च केले असून दोन्ही बजेट फोन आहेत. Lenovo K9 ची किंमत 8,999 रुपये आणि Lenovo A5 ची किंमत 5,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हे दोन्ही फोन फ्लिपकार्ट या संकेतस्थळावर विक्रीसाठी उपलब्ध असतील. Lenovo K9 चे फिचर्स -. Lenovo K9 मध्ये 5.7 इंच फुल स्क्रीन डिस्प्ले आहे. फोनमध्ये 2.0 गीगाहर्ट्ज ऑक्टाकोर प्रोसेसर आणि 3 GB रॅम आहे.
सॅमसंग घेऊन येतोय डबल स्क्रीनचा स्मार्टफोन
सॅमसंग कंपनी मागील काही दिवसांपासून नवनवीन मॉडेल सादर करुन आपल्या ग्राहकांना खुश करत आहे. ड्युल सिम कार्डसारखेच आता मोबाईलला दोन स्क्रीन असणार आहेत. सॅमसंग कंपनी लवकरच आपला हा नवीन फोन लाँच करणार आहे. हा फ्लिप फोन असणार आहे. या फोनचे नाव Samsung Galaxy W2019 असे आहे. या स्मार्टफोनची डिझाईन W2018 यासारखीच असणार आहे. यामध्ये ड्यूअल रियर कॅमराही असणार आहे. W2018मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रैगन ८३५ प्रोसेसर होते, तर W2019मध्ये W2019 ८४५ प्रोसेसर असू शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
अचानक प्रवास करावा लागतोय? 'या' गोष्टी लक्षात ठेवा
सणासुदीच्या हंगामात अनेक वेळा आपल्याला अचानकपणे प्रवास करावा लागतो. फ्लाइट बुकिंग असो किंवा हॉटेलचे रिझर्वेशन, अशा गोष्टी काही काळ अगोदरच केलेल्या बऱ्या. तरीही, नेहेमीच असे होत नाही की आपण प्रवासाचे नियोजन आधीपासून करू शकतो, किंवा आपली आर्थिक परिस्थिती सुदृढ असते. अचानकपणे समोर आलेला नातेवाईकांचा एखादा कार्यक्रम किंवा अनपेक्षित सहल अशा गोष्टी तुम्हाला प्रवास करायला लावू शकतात. आणि यामुळे जर तुमच्याकडे पैशाची अडचण असली तर ते एक आव्हानच असते. पाहूया अशावेळी कमी त्रास करून वेळ कशी निभावून नेता येईल.

Want to stay updated ?

x

Download our Android app and stay updated with the latest happenings!!!


90K+ people are using this