facebook pixel
chevron_right Lifestyle
transparent
बेलपत्र मधुमेहावर गुणकारी
सामना ऑनलाईन । मुंबई. बेलपत्रांमध्ये अॅण्टी-डायबेटिक गुणधर्म मुबलक असतात. म्हणून ही पाने म्हणजे मधुमेह्यांना वरदानच. बेलाच्या पानांमध्ये शुगर आणि कॉलेस्टेरॉल कमी करण्याचे गुणधर्म आहेत. मधुमेहाचा विकार असेल तर बेलपत्रांचा १० ग्रॅम रस दररोज सकाळच्या वेळी प्यायल्यास फायदा दिसून येईल. बेलफळातील बी कुटून घेऊन त्यात कडुलिंबाच्या कोवळ्या पानांचा रस घालून हे मिश्रण थोडे थोडे घेत राहिल्यासही मधुमेहावर आराम पडतो. बेलाची १५ ते २० कोवळी पाने पाण्याने साफ करून घ्यायची. नंतर ती कुटून त्यात थोडे पाणी घाला. त्यातील थोडे मिश्रण दिवसातून दोन-तीनदा घेतल्यास रक्तातील शुगर नियंत्रित राहते.
प्राणायाम करण्याचे महत्व
सामना ऑनलाईन । मुंबई. कामाच्या ताणामुळे प्रत्येकजण त्रासलेला असतो. पण प्राणायाम केल्याने मन शांत होते. कामाचा ताणही बऱ्याच अंशी कमी होतो. दिवसभर धावणाऱ्या मनाला शांत करण्याची ताकद शीतली प्राणायामात असते. पण हा प्राणायाम योग्य प्रकारे करायला हवा. सर्वप्रथम एखाद्या मोकळ्या जागेवर चटई अंथरून त्यावर आरामात बसायचे. मग जिभ बाहेर काढून एखाद्या नळीसारखी बनवायची. त्या नळीद्वारे श्वास आत खेचून घ्या. पोट भरेल एवढी हवा आत घ्या. त्यानंतर जीभ आत घेऊन तोंड बंद करून घ्या. त्यानंतर मान पुढे झुकवून आपल्या जबडय़ाचा पुढचा भाग छातीला लावण्याचा प्रयत्न करा.
साइन इन करा
आरोग्य उत्तम राहण्यासाठी केला जाणारा व्यायाम. कारण ते उत्तम असेल तरच कोणताही खेळ खेळता येतो. पॉवरलिफ्टिंग हा खेळ सर्व खेळांसाठी चांगला आहे. ती जर का नीट असेल तर डाएट नीट होईल. अर्धा तास चालणे, फ्रीहॅण्ड एक्सरसाइज करणे आवश्यक आहे. प्रत्येकाने आवडेल, जमेल असाच व्यायाम करावा. आवश्यक त्या खेळाला पूरक असा व्यायाम करावा. व्यायाम आणि डाएट समतोल कसा राखता? खेळाच्या स्पर्धा करायच्या असतील तर तसा व्यायाम आणि त्या खेळासाठी आवश्यक डाएट करावा.
जाणून घ्या रसपुराण
शमिका कुलकर्णी (आहारतज्ञ) सकाळचा व्यायाम किंवा चालणे हा बऱ्याच जणांच्या जीवनशैलीचा आरोग्यदायी भाग आहे. त्याचबरोबर सकाळचे चालणे झाल्यानंतर आरोग्यपूर्ण पेय म्हणून विविध भाज्यांचे रस पिणे हाही अनेकांच्या सकाळच्या दिनचर्येचा भाग असतो. दुधीचा रस, कारल्याचा रस, गाजराचा रस, गव्हाच्या तृणांकुरांचा रस आम्ही सकाळी पितो म्हणून अनेकजण स्वतःचीच पाठ थोपटून घेतात. दुधीचा रस प्यायल्याने एका महिलेचा मृत्यू ही बातमी नुकतीच आली. मुळात हे रस खरोखरच आरोग्यदायी असतात का. की ते केवळ एक फॅशनेबल रंगीत पाणी असतं. सध्या वजन कमी करण्यासाठी बरेच जण वेगवेगळे उपाय करत असतात.
२१ राज्यं, ४० वाद्यं -Maharashtra Times
एक, दोन नव्हे तर तब्बल चाळीस वाद्यांवर त्याची हुकूमत आहे. भारतातल्या सुमारे २१ राज्यांमध्ये जाऊन तिथल्या लोकसंगीताचा अभ्यास त्यानं केला आहे. मधुर पडवळ या तरुण वादकाची ही सुमधूर गोष्ट. भारतातल्या विविध राज्यांमधल्या लोकसंगीताचा त्याचा अभ्यास दांडगा आहे. त्यासाठी त्यानं २१ राज्यांमध्ये प्रवास केला आहे. तब्बल ४० हून अधिक वाद्यांवर त्याची हुकूमत आहे. मधुर पडवळ या तरुण वादकाचा हा संगीतमय प्रवास पाहून अक्षरश: थक्क व्हायला होतं. या वाद्यवादनाचे लाइव्ह शो तो करतो. तसंच त्यानं काही सिनेमांना संगीतही दिलं आहे.
सोमवारसाठी आरोग्यमंत्र -Maharashtra Times
सुनील गोडबोले, बालरोग तज्ज्ञ. पावसाळा आला, की आनंद होतो खरा; परंतु त्याच वेळेस चिंतातूर पालकांच्या छातीत धस्स होते ते लहानग्यांच्या पावसाळी आजारांच्या भीतीने. पावसाळा सुरू झाला, की तापमानात सतत बदल होतात. हवेत एक प्रकारचा ओलावा आलेला असतो. सूर्य ढगांआड जातो; त्यामुळे उन्हाने जंतूंचा नाश होणे बंद होते. आपलीही प्रतिकार यंत्रणा कमकुवत होते. या सगळ्यातून पुढे सरसावतात सर्दी-खोकल्याचे विषाणू. एन्फ्ल्यूएन्झा व्हायरस म्हणजेच फ्ल्यूचा विषाणू यातील आघाडीवरचा कलाकार. काही वर्षांपासून सुरू झालेला स्वाइन फ्लू हा वेगळा आजार आहे. याची भीती जास्त आहे.
डस्टबिनच बनवणार खत -Maharashtra Times
घरातल्या डस्टबिनमध्ये तुम्ही कचरा टाकता, तो कचऱ्याचा डबाच दहा दिवसांत त्यातून खतनिर्मिती करतो. कशी वाटली ही कल्पना? अशीच स्मार्ट डस्टबिन तयार केलीय ऐश्वर्या माने या विद्यार्थिनीनं. आयडीसीच्या नुकत्याच पार पडलेल्या 'डिझाइन अँड डिग्री शो'मध्ये ती पाहायला मिळाली. या शोमध्ये पाहायला मिळालेल्या काही उल्लेखनीय प्रोजेक्ट्सविषयी. प्रथमेश राणे, आरएडीएव्ही कॉलेज. एकापेक्षा एक नवनवीन कल्पनांचं भांडार म्हणून आयआयटीच्या इंडस्ट्रीयल डिझाइन सेंटरकडे (आयडीसी) पाहिलं जातं. विद्यार्थ्यांना आपल्या भन्नाट कल्पना मांडण्याची संधी आयडीसीच्या 'डिझाइन अँड डिग्री शो'मध्ये मिळते.
तुमची भूमिका काय? -Maharashtra Times
रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या व्यक्तीला त्याची चूक दाखवून देणारा अनुष्का शर्माचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. आपण केलेली चूक राहिली बाजूलाच, उलट त्यानं अनुष्कालाच लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. तिची बोलण्याची पद्धत चुकीची होती, असा उलटा कांगावा त्यानं केला. शहराची स्वच्छता असो वा सुरक्षा, ही केवळ सरकारी यंत्रणांची जबाबदारी आहे. आपण मात्र वाट्टेल तसं वागू शकतो या मनोवृत्तीचं ती व्यक्ती म्हणजे एक प्रातिनिधीक उदाहरण. अशी अनेक माणसं आपण आपल्या आजुबाजूला पाहत असतो.
Health Tips : पावसाळ्याच्या तापात घ्या खबरदारी
यूएई सरकारनं पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी जगातील कुठल्याही कोपऱ्यात प्रवास करताना या. पुण्यातील आळंदी येथे अकरा महिन्याच्या मुलाने रिमोटचा सेल गिळला आहे. हुजैफ तांबोळी असे या. रायगड जिल्ह्याला हादरून सोडणाऱ्या महड विषबाधा प्रकरणाच्या पोलीस तपासाला अखेर यश आले आहे. आरोग्यासाठी फायदेशीर म्हणून लोकं अनेक फळ व भाज्यांच्या रसाचे सेवन करतात. मात्र दुधी भोपळा .
पाणी हे त्वचेसाठी सर्वत चांगले औषध
त्वचा निरोगी ठेवण्यासाठी दिवसातून दहा ते बारा ग्लास पाणी प्यायला हवे. हा पाण्याचा पुरवठा तुम्ही केला नाही तर शरीराला लागणारे पाणी त्वचेतून खेचले जाते. ते टाळण्यासाठी दिवसभरातून खूप वेळा पाणी प्या. त्वचा कोरडी पडू नये म्हणून आणि त्वचेतल्या पाण्याची कमतरता होऊ नये म्हणून त्वचेला मॉइश्‍चरायझर लावावे. त्यामुळे त्वचा सैल पडत नाही. मॉइश्‍चरायझर लावायची सर्वात चांगली वेळ म्हणजे चेहरा धुतल्यावर किंवा अंघोळ केल्यानंतर लावावे. कारण त्यावेळेस त्वचा जास्त कार्यशील असते. साधे मॉईश्‍चरायझर लावल्यानंतर मॉईश्‍चरायझिंग फेस मास्क लावला तर त्वचेसाठी ते जास्त फायदेशीर असते.
कॅनडातील बाळं सर्वात किरकिरी!
रडणार्‍या बाळाला शांत करणं हे मोठेच जिकिरीचे काम असते. काही बाळं दिवसभर पाळण्यात डाराडूर झोपतात आणि रात्रभर किरकीर करून आई-बाबांच्या नाकीनऊ आणतात. किरकिरण्याच्या बाबतीत जगात कॅनडातील बाळं सर्वात अव्वल आहेत असे एका पाहणीत आढळले आहे. तिकडची मुलं एकदा रडायला लागली की 3-4 तास सलग भोकाड पसरतात. त्यांना शांत करता करता अनेकदा आई-वडिलांचा रक्तदाबही वाढतो, असेही आढळले आहे! संशोधकांच्या एका गटाने 8700 बाळांची याबाबत पाहणी केली. यासाठी डेनमार्क, इटली, ब्रिटन, र्जमनी, कॅनडा या देशातील मुलांची निवड करण्यात आली.
काल नको होती, आजही नकोच आहे -Maharashtra Times
मुलगी नको, हा नारा आजही अनेक ठिकाणी दिसतो. काही ठिकाणी तो थेट असतो, तर काही ठिकाणी छुपा. लगतच्या काळात अशा काही घटना समोर आल्या आणि आपण कितीही शिकलो, प्रगत झालो, तरी मुलगा-मुलगी हा भेद मनात आहेच, हे सिद्ध झाले. चौथीही मुलगी झाली म्हणून उंबऱ्याच्या आतही न घेता आई - वडिलांनीच तिला हॉस्पिटलमधून तिला थेट अनाथालयाचा रस्ता दाखविला. पुण्यात नुकताच हा धक्कादायक प्रकार घडला. सांस्कृतिक राजधानी, शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात घडलेला हा प्रकार आजही मुली नकोशाच आहेत, याची दाहकता स्पष्ट करतो.
सुनेच्या विरोधात तक्रार -Maharashtra Times
घरगुती हिंसाचारविरोधी कायदा २००५ अंतर्गत सुनेच्या विरोधात सासू तक्रार नोंदवू शकते का? त्यासाठी कुटुंबात एखादा पुरुष सदस्य असण्याची गरज असते का? कुटुंबात पुरुष सदस्य नसला, तरी सासूला सुनेविरुद्ध तक्रार करता येईल का? उत्तर : कुटुंबसंस्था, विशेषत: भारतीय संकल्पनेतून पाहता, खूपच सर्वसमावेशक असते. भारतातील एकत्र कुटुंबपद्धतीमध्ये अनेकविध नात्यातून मोठा गोतावळा कुटुंबाच्या एका छत्राखाली नांदत असतो. अगदी न्यूक्लिअर विभक्त कुटुंब म्हटले, तरी त्यातून जवळचे, सख्खे नातेवाइक बाहेर काढता येत नाहीत.
मैफल रंगते तेव्हा... -Maharashtra Times
मैफल रंगते म्हणजे काय, तर गायक आणि रसिक या दोघांनाही त्याचा आनंद मिळतो. रसिकांना उत्तम ते द्यायचे, प्रेक्षकांची नस ओळखून सादरीकरण करायचे आणि श्रवणाचा उच्च अनुभव देणे ही गायकाची जबाबदारी असते. तर भौतिक गोष्टींमुळे इतर रसिकांचा आणि गायकाचा रसभंग होऊ न देण्याची जबाबदारी श्रोत्यांची असते. या दोन्ही बाजू एकमेकांसाठी मनापासून झटतात, तेव्हा ती मैफल रंगतेच रंगते मंजूषा पाटील. कोणताही कलाकार हा रसिकांच्या प्रेमामुळे, प्रतिसादामुळे मोठा होत असतो. अर्थात, यामध्ये त्याची प्रतिभाही वरच्या स्थानावर येते.
कासवाच्या चालीने जानकीला सापडलेला किनारा -Maharashtra Times
कासव हे एक प्रतीक आहे न कंटाळता हळूहळू चालण्याचे. 'कासव'मधील जानकीला त्याच्या आधारानेच किनारा सापडतो. ती मानवेंद्रची आई होते आणि त्यालाही त्याच्या कोषातून बाहेर काढते. आपल्याला आपले गाणे समजणे आणि ते खुलेपणाने गाता येणे, हे महत्त्वाचे. दोघांना ते सापडते आणि त्यांचे जग बदलते. सुमित्रा भावे जानकी (इरावती हर्षे) ही 'कासव' या चित्रपटाची नायिका. जानकी म्हणजे जनकाची मुलगी. आपल्या पुराणकथेत जनक राजा अत्यंत अभ्यासू म्हणून ज्ञानी. अत्यंत वैभवसंपन्न आणि सखोल ज्ञानी म्हणून विरागी, असे त्याचे वर्णन आहे.
उन उन खिचडी -Maharashtra Times
'उन उन खिचडी, साजूक तूप' हे आपण ऐकलेले आहे. आपल्याकडे खिचडी न खाल्लेला माणूस सापडणे अवघडच. लहानपणापासून म्हातापणापर्यंत ही खिचडी आपल्याला साथ देते. भारताबरोबर चीन सोडल्यास आशियायी देशातही ही प्रिय आहे. येथे आलेल्या मुघलांना ही आवडली, ब्रिटिशांनाही आवडली. डाळ आणि तांदूळाचा शोध लागला आणि त्याचबरोबर खिचडीही तयार झाली असावी, असे मला वाटते. खिचडीचा इतिहास हा दोन ते अडीच हजार वर्षांपूर्वीचा आहे, असे म्हणतात. भारतात महाराष्ट्रासह राजस्थान, गुजरात, उत्तरप्रदेश, बंगाल, मध्यभारत अशा जवळपास सर्वच ठिकाणी खिचडी हा अतिशय लोकप्रिय असा पदार्थ आहे.

Want to stay updated ?

x

Download our Android app and stay updated with the latest happenings!!!


90K+ people are using this