facebook pixel
chevron_right Politics
transparent
तुकाराम मुंढेच्या साफसफाईने नेत्यांचे हक्काचे कार्यकर्ते झाले बेघर
आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महापालिका मालमत्तांची तपासणी आणि साफसफाईची मोहिम अधिक वेगवान केली आहे. यामध्ये महापालिकेच्या उद्याने, इमारतींत आपली खासगी मालमत्ता समजुन विविध नगरसेवक, नेत्यांनी लोकांना राहण्यास दिली होती. ही सर्व घरे रिकामी करण्यात आली आहेत. या कारवाईत चोवीस तास उपलब्ध असणारे हक्काचे कार्यकर्ते बेघर झाले. त्यांच्यावर अवलंबुन असलेल्या नेत्यांनाही राजकीय कामकाजाच्या दृष्टीने पोरके वाटु लागले आहे. गेल्या महिन्यात नाशिक रोड भागात 'वॉक वीथ कमिशनर' उपक्रमात काही नागरिकांनी त्यांच्या भागात असलेली व्यायामशाळा बंद असल्याची तक्रार केली होती.
कारवाईच्या धास्तीने अधिकाऱ्यांना घेतलाय तुकाराम मुंढेंचा धसका
गोदावरी पुररेषेतील लॉन्सवरील अतिक्रमण कारवाईत न्यायालयाचा अवमान झाल्याचे प्रकरण आयुक्त तुकाराम मुंढे यांनी चांगलेच मनावर घेतले आहे. स्थगिती आदेश कुठे, कोणी रखडवला याच्या शोधासाठी त्यांनी शनिवारी रमजान ईदच्या सुटीच्या दिवशी नगररचना विभागाची चांगलीच हजेरी घेतली. त्यामुळे काही अधिकाऱ्यांनी त्याचा चांगलाच धसका घेतला आहे. गोदावरी नदीच्या पूररेषेतील स्प्रिंगफील्ड लॉन्सचा काही भाग अतिक्रमण निर्मूलन विभागाने पाडला होता. त्यासाठी मालक व माजी महापौर प्रकाश मते यांनी मुंबई उच्च न्यायालयाकडून स्थगिती मिळवली होती. स्थगिती आदेशानंतरही कारवाई झाल्याने न्यायालयात आयुक्तांना माफी मागावी लागली होती.
नगरमध्ये वाळू तस्करांविरोधात कलेक्टरांचा "ऍक्‍शन प्लॅन' : मुसक्‍या आवळण्यासाठी कठोर कारवाई
जिल्ह्यातील वाढत्या बेकायदेशीर वाळू उत्खननाला आळा घालण्यासाठी अॅक्शन प्लॅन' तयार करण्यात आला असून, विविध विभागांच्या एकत्रित प्रयत्नातून वाळू तस्कराच्या मुसक्‍या आवळण्याचे नियोजन करण्यात आले आहे. वाळू तस्करीचा बिमोड करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले आहेत. संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात द्विवेदी यांनी बैठक घेतली.
सेवेतल्या अधिकाऱ्याची पिंपरी महापालिकेला कायदेशीर नोटीस
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील गत सत्ताधारी राष्ट्रवादीने पदोन्नती दिलेल्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांचे पंख छाटण्याचे विद्यमान सत्ताधारी भाजपचे प्रयत्न सुरुच आहेत. त्यामुळे सबंधित अधिकाऱ्याने आता पालिकेला कायदेशीर नोटीसच बजावली आहे. नमूद करण्याजोगी बाब म्हणजे हे अधिकारी अद्याप पालिका सेवेत आहेत. असे असूनही त्यांनी आपल्या हक्कासाठी पालिकेविरुद्ध कायदेशीर लढा पुकारलेला आहे. रॉय यांनी यापूर्वीच आपल्या पदावनती विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. त्यावर 'जैसे थे'चा आदेश आहे. असे असतानाही प्रथम त्यांचे आर्थिक अधिकार काढून घेण्यात आले.
महापालिका आयुक्त निपूण विनायक यांचा ट्विटरद्वारे समस्या सोडवण्यावर भर
महिन्याभरापूर्वी महापालिकेचे आयुक्त म्हणून दिल्लीहून स्वच्छता अभियानाचे संचालक असलेले डॉ. निपूण विनायक रूजू झाले. स्वच्छता अभियानाची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पेललेली असल्यामुळे आणि शहरात कचऱ्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाल्यामुळे त्यांची खास नियुक्ती करण्यात आल्याचे सांगितले जाते. महापालिका कार्यालय म्हणजे सतत गजबजलेले. आयुक्तांकडे कैफियत घेऊन येणाऱ्यांची संख्या त्यात अधिकच. पण दिवसभर दालनाबाहेर सामान्यांना प्रतिक्षा करायला लावणे पटत नसल्याने आयुक्त निपूण विनायक यांनी थेट सोशल मिडियाचा आधार घेत आपल्या तक्रारी ट्‌विटरद्वारे मांडण्याच्या सूचना केल्या. प्रशासकीय सेवेत काम करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची कार्यपध्दती नेहमीच सामान्यांच्या चर्चेचा विषय राहिली आहे.
मंत्रालयाचे 'ते' दालनच मंत्र्यांसाठी अपशकुनी !
भाजपचे जेष्ठ नेते आणि कृषिमंत्री भाऊसाहेब तथा पांडुरंग फुंडकर यांच्या आकस्मित निधनाने मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील 'ते' दालन तेथे बसणाऱ्या मंत्र्यांसाठी पुन्हा अपशकुनी ठरल्याची चर्चा राजकीय नेते आणि ब्युरोक्रसीत आहे. सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांच्या दालना शेजारीच हे दालन आहे. राज्यात 1995 साली युतीची सत्ता आल्यानंतर उपमुख्यमंत्रीपद निर्माण करण्यात आले. हीच परंपरा नंतर काँग्रेस आघाडीची सत्ता असेपर्यंत कायम राहिली. काँग्रेस आघाडीच्या सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला उपमुख्यमंत्री पद होते. उपमुख्यमंत्री राहिलेल्या छगन भुजबळ यांच्यानंतर आर. पाटील यांच्याकडे हे पद होते. भुजबळ यांना आघाडीच्या पहिल्या टर्ममध्ये राजीनामा द्यावा लागला होता.
शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांची बदली
अखेर गेल्या काही वर्षांपासून विविध निर्णयांमुळे वादग्रस्त ठरलेले शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांची सोमवारी (ता.11) बदली झाली. त्यांच्यावर आता सामान्य प्रशासन विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. वंदना कृष्णा या नव्या शिक्षण सचिव असणार आहेत. कृष्णा या सध्या अर्थ विभागात कार्यरत होत्या. नंदकुमार यांनी शालेय विभागाचे प्रधान सचिव असताना काही नवीन निर्णय घेण्याचा प्रयत्न केला. त्यात प्रामुख्याने राज्यातील मराठी शाळा बंद करणे, पुस्तक, शाळांमधील राष्ट्रीय नेत्यांच्या प्रतिमा आणि शाळांसाठी अग्निशामक यंत्र खरेदी आदींचा समावेश होता. विशेष म्हणजे हे सर्वच्या सर्व निर्णय वादग्रस्त ठरले होते.
अभिमन्यू काळेंवर निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यावर बंदी?
निवडणूक कामात हलगर्जीपणाचा ठपका ठेऊन आयएएस अधिकारी अभिमन्यू काळे यांच्यावर पुढील पाच वर्षे निवडणूक प्रक्रियेत सहभाग होण्यावर निवडणूक आयोगाने बंदी टाकल्याचे समजते. सध्या ते सक्तीच्या रजेवर आहेत. अभिमन्यू काळे गोंदियाचे जिल्हाधिकारी होते. नुकत्याच पार पडलेल्या भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. अनेक ईव्हीएम मशीन बंद पडल्या होत्या. या मतदारसंघातील 49 मतदान केंद्रांवर पुन्हा मतदान घ्यावे लागले होते. यासाठी अभिमन्यू काळे यांनी योग्य पूर्वतयारी केली नव्हती, असा ठपका निवडणूक आयोगाच्या निरीक्षकांनी ठेवला आहे. निवडणूक आयोगाचे अधिकारी अश्‍विनीकुमार नुकतेच नागपुरात येऊन गेले.
भंडाऱ्याचे नवे जिल्हाधिकारी शांतनु गोयल रुजू
जिल्हाधिकारी म्हणून आज शांतनु गोयल यांनी मावळते जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याकडून पदभार स्विकारला. सुहास दिवसे यांची नागपूर महानगरपालिका येथे अतिरिक्त आयुक्त पदावर बदली झाली आहे. आज ते कार्यमुक्त झाले. शांतनु गोयल हे भारतीय प्रशासकीय सेवेच्या 2012 बॅचचे आय.ए.एस अधिकारी आहेत. भंडारा जिल्हाधिकारी या पदावर रुजू होण्यापूर्वी गोयल हे महानगर पालिका नागपूर येथे अतिरिक्त आयुक्त या पदावर कार्यरत होते. त्यांनी प्रशासकीय सेवेची सुरुवात चंद्रपूर जिल्हयातील राजूरा येथील उपविभागीय अधिकारी या पदापासून केली असून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, गडचिरोली या ठिकाणी सुध्दा त्यांनी काम केले आहे.
सीईओ डॉ. नरेश गितेंचा निधीशिवाय कुपोषण निर्मूलनाचा पॅटर्न
गेली दोन दशके राज्यात सत्तेत आलेल्या प्रत्येक सरकारने आटापीटा करुनही कुपोषणाची समस्या कायम आहे. जिल्हा परिषदेचे सीईओ यांनी आपल्या पुर्वानुभवाच्या जोरावर त्यासाठी त्रिस्तरीय नियोजन केले आहे. शासनाचा स्वतंत्र निधी न वापरता आहार नियोजनातून कुपोषण निर्मूलन अपेक्षित आहे. प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि प्रात्याक्षिकांद्वारे नाशिक जिल्हा कुपोषणमुक्त करायचा आहे. तो यशस्वी झाल्यास आदिवासींची महत्वाची समस्या सुटेल. त्यामुळे राज्यभरातील प्रशासन व आदिवासी लोकप्रतिनिधींना या 'पॅटर्न'विषयी उत्सुकता आहे. 'युनिसेफ'च्या मदतीतुन गेली दहा वर्षे राजमाता जिजाऊ मिशन राबविण्यात आले. तरीही कुपोषणाचा प्रश्‍न सुटला नाही.
मंत्रालयातील सात अतिवरिष्ठ सनदी अधिकारी प्रशिक्षणासाठी रवाना
भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्याच्या मसुरी येथील अकादमीतील प्रशिक्षणासाठी मंत्रालयातील सात ज्येष्ठ सनदी अधिकारी रवाना झाले असून, हे प्रशिक्षण तब्बल वीस दिवस चालणार आहे. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव डॉ. भूषण गगराणी, मुख्यमंत्री कार्यालयातील विशेष कार्यकारी अधिकारी आणि प्रधान सचिव अनिल डिग्गीकर यांचा यामध्ये समावेश आहे. सनदी सेवेतील प्रत्येक अधिकाऱ्यांना त्यांच्या सेवाकाळात प्रत्येक टप्प्यावर मसुरी येथील प्रशासकीय अकादमीत प्रशिक्षण पूर्ण करावे लागते. यानुसार 4 जून ते 22 जून या कालावधीत हे प्रशिक्षण होणार आहे. यामध्ये मंत्रालयातील सचिव दर्जाच्या सात अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
खंडकरी शेतकऱ्यांच्या प्रश्‍नासाठी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील मंत्रालयामध्ये
माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी खंडकरी शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्‍नासाठी महसूलचे अप्पर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांची आज बुधवारी (ता. २३) रोजी मंत्रालयामध्ये भेट घेवून खंडकरी शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्याची मागणी केली. श्रीवास्तव यांनी खंडकऱ्यांच्या प्रश्‍नामध्ये लक्ष घालून राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी तातडीने चर्चा करुन स्वतंत्र अधिकाऱ्यांची नेमणूक करणार असल्याचे आश्वासन दिल्याी माहिती पाटील यांनी दिली. 'राज्यामध्ये सात जिल्हामध्ये खंडकऱ्यांचे प्रश्‍न प्रलंबित आहेत. यामध्ये पूर्वी खंडकरी शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या जमीनीचा वर्ग-२ चा शेरा काढावा. खंडकरी शेतकऱ्यांना पाटपाण्याच्या हक्कासहित जमीने वाटप झाले असून शेतकऱ्यांना प्राधान्याने पाणी देण्यात यावे.
सिडकोतील तुकाराम मुंढेंच्या अतिक्रमण निर्मूलन कारवाईस मुख्यमंत्र्यांची स्थगिती?
सिडको भागात मंजूर घरांमध्ये केलेल्या वाढीव बांधकामांमुळे सुविधा देण्यात बाधा येते. त्यामुळे ती पाडण्याचा आदेश अतिक्रमण निर्मूलन विभागाला महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले होते. त्याबाबत सिडको भागातील नागीरकांत मोठा रोष होता. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली असून त्याबाबतचे आदेश काढण्याच्या सूचना नगर विकास विभागाला दिल्याची माहिती आमदार सीमा हिरे यांनी दिली. शहरातील सिडको वसाहतीतील चोवीस हजार 518 घरांमध्ये मंजुर क्षेत्रापेक्षा जादा बांधकामे करुन त्याचा निवासी तसेच व्यवसायिक वापर केला जात आहे. भुयारी गटारी, नाले, रस्ते यावर ही बांधकामे आहेत.
फडणवीस सरकारची खूषखबर : SC भूमिहिनांना मोठ्या प्रमाणात जमिनी मिळणार
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत दारिद्य्ररेषेखालील भूमिहीन लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणात जमीन उपलब्ध करून देण्यासाठी जमीन मालकाला रेडीरेकनर दराच्या दुपटीपर्यंत मोबदला देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचे राहणीमान उंचावण्यासह त्यांना कायमस्वरूपी उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना राबविण्यात येते. याअंतर्गत संबंधित समाजातील दारिद्य्ररेषेखालील आणि भूमिहीन शेतमजूर कुटुंबांना चार एकर जिरायती (कोरडवाहू) किंवा दोन एकर बागायती (ओलिताखालील) जमीन उपलब्ध करून देण्यात येते.
इंजिनिअर रवी पाटील बेपत्ता प्रकरणाने नाशिक महापालिकेतील कोंडमारा चर्चेत!
महापालिकेतील सहाय्यक अभियंता रवी पाटील दोन दिवसांपूर्वी 'आत्महत्या कीरत आहे'ल अशी चिठ्ठी लिहून बेपत्ता झाले. त्यांचा अद्याप काहीही तपास लागलेला नाही. सोशल मिडीयावर त्यांना 'परत या' असे आवाहन केले जात आहे. या प्रकरणाच्या निमित्ताने महापालिकेतील अभियंत्यांचा प्रदीर्घ काळापासून कोंडमारा होत असल्याची चर्चा आहे. त्यात मुदतपुर्व निवृत्ती घेतलेल्यांची मोठी यादीच पुढे आली आहे. त्यामुळे महापालिकेत अभियंत्यांचाच कोंडमारा का होतो याचीही चर्चा सुरु झाली आहे. बेपत्ता झालेल्या रवी पाटील यांचे मित्र डॉ. शिरीष राजे यांनी लिहिलेले पत्र सगळीकडे व्हायरल झाले आहे.
सीईओ नरेश गिते गेटवर अन्‌ दुचाकीस्वारांची पळापळ!
शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या जिल्हा परिषदेची इमारत म्हणजे कोणीही या अन्‌ पार्कींग करुन जा अशी स्थिती. गेल्या अनेक वर्षांत प्रयत्न करुनही ही समस्या सुटत नव्हती. नवे सीईओ नरेश गिते यांनी पुढाकार घेत नामी शक्कल शोधली. दुचाकी पार्कींगसाठी जागा निश्‍चित केली. ते स्वतः गेटवर येऊन थांबले अन्‌ ओळखपत्र तपासणी करुनच वाहने बाहेर सोडली. त्यामुळे बाहेरच्या दुचाकीस्वारांची अक्षरशः पळापळ झाली. अन्‌ दोनच दिवसांत हा प्रश्‍न सुटला. शुक्रवारी कार्यालयीन कामकाज संपल्यावर सायंकाळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी ओळखपत्र तपासल्यावरच दुचाकी वाहने बाहेर सोडण्याच्या सुचना केल्या.
तुकाराम मुंढे पंधरा दिवसाच्या रजेवर, बदलीची नाशिकमध्ये चर्चा
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे पंधरा दिवसांच्या रजेवर जाणार आहेत. ही रजा पंधरा दिवसांपूर्वीच मंजुर झाली आहे. मात्र, या निमित्ताने मुंढे विरोधकांनी मात्र रजा नव्हे तर त्यांच्या बदलीचीच चर्चा महापालिका वर्तुळात पसरवली आहे. शहरात गेल्या पाच महिन्यांपासून आयुक्त मुंढे त्यांच्या धडाकेबाज कारवाई, विविध निर्णयांनी सतत चर्चेत राहिले आहेत. प्रशासकीय कामकाजाची कार्यपध्दती, जलद निर्णय व कार्यवाहीसाठी आठवड्याला आढावा यांमुळे सबंध प्रशासन एकीकडे अॅक्टीव्ह तर दुसरीकडे दबावात आहे. सिडकोतील अनधिकृत घरे तोडण्याचा निर्णय घेतल्याने तेथील नागरिक संतप्त झाले आहेत.
नाशिकचे सहाय्यक अभियंता रवी पाटील बेपत्ता : कामाच्या ताणाने आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी सापडली
महापालिकेचे नगररचना विभागातील सहाय्यक अभियंता रवी पाटील आज साकळी कार्यालयीन कामकाजासाठी बाहेर पडले. मात्र त्यानंतर ते बेपत्ता झाल्याने याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करम्यात आली आहे. पाटील यांच्या तपासासाठी तीन पथके रवाना करण्यात आले आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली. पाटील मूळचे अंमळनेर (जळगाव) येथील आहेत. आज सकाळी सहाला 'वॉक वीथ कमीश्‍नर' कार्यक्रमासाठी घराबाहेर पडले. त्यानंतर दुपारी कुटुंबीयांनी त्यांच्याशी संपर्क केला असता प्रतिसाद मिळाला नाही. इमारतीच्या पार्कींगमध्ये त्यांची कार व त्यातच मोबाईल आढळला.
सर्व मंत्री प्रचारात मंत्रालयात अभ्यागत डाराडूर !
पालघर आणि भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूकित अख्खे मंत्रिमंडळ व्यस्त असल्यामुळे सध्या एकही मंत्री मंत्रालयात फिरकत नाही. त्यामुळे कामानिमित्त आलेल्या अभ्यागताना हेलपाटे मारावे लागत आहेत. मंत्री महोदय भेटत नाहीत आणि कामही होत नाही म्हणून दमलेल्या एका अभ्यागताने मंत्रालयात बाकावर आज अशी ताणून दिली. दोन्ही पोटनिवडणुकीत शिवसेना भाजप स्वतंत्र लढत आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही निवडणूक इतकी प्रतिष्ठेची केली की गेला आठवडाभर ते दोन्ही मतदारसंघात व्यस्त होते.
मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक औरंगाबादला येताना विमानातच लागले कामाला
महापालिकेचे नवे आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी मंगळवारी (ता. तत्पर्वी त्यांच्या विमानाने मुंबईहून औरंगाबादला जाण्यासाठी टेकऑफ केले तेव्हा विमानातच निपुण विनायक यांचे कामकाज सुरू झाले. तासभराच्या विमान प्रवासात त्यांनी औरंगाबाद शहरातील सह प्रवाशांना स्वःताची ओळख करून देत चिठ्यांवर शहराचा महापालिका आयुक्त म्हणून आपल्या माझ्याकडून काय अपेक्षा आहे त्या लेखी स्वरूपात मागितल्या. विनायक निपुण यांची कामप्रती असलेली ओढ पाहून शहरातील सहप्रवाशांनी निश्‍चितच समाधान व्यक्त केले असावे.औरंगाबाद महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर मंगळवारी डॉ. निपुण विनायक यांनी पदभार स्वीकारला.

Want to stay updated ?

x

Download our Android app and stay updated with the latest happenings!!!


90K+ people are using this