facebook pixel
chevron_right Science
transparent
१२ जानेवारीला भारतातून ३१ उपग्रह अवकाशात झेपावणार
येत्या १२ जानेवारी यादिवशी आध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथून तब्बल ३१ उपगग्रह अवकाशात सोडणार आहे. यांमध्ये पृथ्वीचे निरीक्षण करणाऱ्या कार्टोसॅट या अंतरिक्षयानाचाही समावेश आहे. या ३१ उपग्रहांमध्ये २८ अमेरिकेतील, तर उर्वरित देशांमधील उपग्रहांचा समावेश आहे. हे सर्व उपग्रह १२ जानेवारीला सकाळी ९.३० वाजता सोडण्यात येणार आहेत अशी माहिती इस्त्रोचे जनसंपर्क संचालक देवीप्रसाद कर्णिक यांनी दिली आहे. या मिशनसाठी यापूर्वी १० जानेवारी हा दिवस तात्पुरत्या स्वरूपात ठरवण्यात आला होता. मात्र त्यानंतर १२ जानेवारी ही तारीख नक्की करण्यात आली आहे.
मुंबई १३ अंश
उत्तरेतील थंडीच्या लाटेपाठोपाठ मुंबईतील किमान तापमानात कमालीची घट झाली असून, रविवारी सांताक्रूझमध्ये‌ किमान तापमान १३ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले होते. त्यामुळे रविवार यंदाच्या मोसमातील सर्वात कमी तापमानाचा दिवस ठरला. पुढील चोवीस तासांत मुंबईतील किमान तापमान सरासरी १५ अंश सेल्सिअस राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून आल्हाददायक थंडी पसरली आहे. गेल्या आठवड्यात काही दिवस सकाळी धुक्याचे साम्राज्य पसरले होते. त्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून धुक्याची चादर हटली असली तरी, थंडीचा कडाका मात्र वाढतच आहे. हिमाचल प्रदेशात तापमानाचा पारा खाली आला आहे.
सरत्या वर्षाला हरित निरोप..
मानवी हस्तक्षेपामुळे अस्वच्छ झालेल्या निसर्गाची हानी भरून काढण्यासाठी मुंबईकर नागरिकांनी हाती घेतलेली स्वच्छता मोहीम सरत्या सूर्याला निरोप देतानाही कायम होती. रविवारी २०१७ ला निरोप देताना क्लीन अप वर्सोवा बीच आणि रिव्हरमार्च या दोन व्यासपीठांच्या माध्यमातून मुंबईतील समुद्रकिनारा आणि नदी यांची स्वच्छता करण्यात आली. बिग बी अमिताभ बच्चन यांनी वर्सोवा समुद्रकिनारा स्वच्छता मोहिमेसाठी ट्रॅक्टर आणि एस्कव्हेटरची भेट दिली. या दोन्ही यंत्रांचा वापर करून रविवारी सकाळी सात वाजल्यापासून समुद्रकिनारा आणि खाडी यांची स्वच्छता करण्यात आली. या स्वच्छतेनंतर 'स्वच्छ मुंबई हरीत मुंबई'चा नारा जपत वृक्षारोपणही करण्यात आले.
मुंबई तर अधिक प्रदूषित
दम्याच्या त्रासामुळे आपला कोल्हापूरच्या मेडिकल कॉलेजमधील प्रवेश मुंबई किंवा पुण्यातील कॉलेजमध्ये हस्तांतरित करावा, अशी विनंती करणाऱ्या एका विद्यार्थिनीची याचिका नुकतीच फेटाळून लावताना 'प्रदूषण तर मुंबईत अधिक आहे,' असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले. कोल्हापूरमधील गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये शिकत असलेल्या या विद्यार्थिनीने आपल्या प्रकृतीचे कारण देत हा प्रवेश अन्यत्र हस्तांतरित करावा, अशी विनंती वैद्यकीय शिक्षण विभागाच्या संचालकांना केली होती. त्यासाठी तिने मुंबईतील चार सरकारी मेडिकल कॉलेजे व पुण्यातील एक सरकारी मेडिकल कॉलेजचे पर्याय दिले होते. मात्र, संचालकांनी तिचा अर्ज फेटाळून लावला होता.
आरोग्याला वाढता धोका इ-कचऱ्याचा
इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची बाजारपेठ वेगवान बनली आहे. अनेक वस्तू अगदी काही महिन्यात जुन्या ठरत आहेत. त्याचा परिणाम इ-कचऱ्याचे प्रमाण भयानक वाढण्यात होत असून, आपण या साऱ्यांकडे अजूनही भंगार म्हणूनच पाहत आहे, पण या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू केवळ भंगार नसून त्या कचऱ्याचे विघटन शास्त्रशुद्ध पद्धतीने केले जात नसल्याने त्यातून बाहेर पडणाऱ्या प्रदूषकांचे परिणाम प्रत्येक नागरिकाच्या थेट आरोग्यावर होत आहेत. भावी पिढीसाठी ही धोक्याची घंटा असल्याने आत्ताच या धोकादायक इ-कचऱ्याला नियंत्रणात आणण्याची गरज आहे.
थंडीचा कडाका कायम; 'न्यू इअर' कुडकुडतच
नोव्हेंबरच्या शेवटी आणि डिसेंबरच्या सुरुवातीला बोचरी थंडी होती. मात्र, डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू झालेला थंडीचा कडाका कायम आहे. उत्तर भारतात थंडीची लाट असल्याने नागपूरसह विदर्भात पारा घसरला असून कडाक्याची थंडी पडू लागली. ही थंडी आठवडाभर कायम राहणार असल्याने यंदाचा 'थर्टी फर्स्ट'सुद्धा कुडकुडतच होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात पाऱ्याने नागपुरातील नीचांक गाठला होता. तेव्हा नागपुरातील पारा ८.९ वर तर गोंदियातील पारा ८ अंश सेल्सिअसवर स्थिरावला होता. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात विदर्भात चांगलीच थंडी सुरू झाली होती.
प्रदूषणकारी कारखान्यांवर कारवाई
नवी मुंबई शहरात जल आण‌ि वायूप्रदूषण होत असल्याबाबत राज्य सरकारने कबुली दिली आहे. हे प्रदूषण करणाऱ्या एका कंपनीला उत्पादन बंद करण्याचे आदेश देण्यात आले असून नऊ कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची लेखी माहिती पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी सोमवारी विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात दिली. नवी मुंबईतील प्रदूषणाचा गंभीर विषय तारांकित प्रश्नांच्या माध्यमातून आमदार संदीप नाईक यांनी मांडला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. नवी मुंबईत वाढत्या जल आणि वायू प्रदूषणामुळे नागरिकांना श्वसनाचे त्रास होत आहेत. नागरिकांनी याबाबत आमदार नाईक यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या.
शहराचा पारा १० अंशांवर
शहरात थंडीने चांगलाच जोर पकडला असून, सोमवारपासून निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणाने गारठ्यात आणखी भर पडली आहे. मंगळवारीही वातावरण ढगाळच असल्याने नाशिककरांना उबदार कपड्यांचा वापर करावा लागला. ओखी चक्रीवादळाचा परिणाम राज्याच्या हवामानावरही झाल्याचे दिसत असून, शहर परिसरात शनिवारपासून थंडीने चांगलाच जोर पकडला आहे. गत आठवड्यात १३ अंश सेल्सिअस असलेले तापमान सोमवारी अचानक १२.५ वर येऊन ठेपले, तर मंग‍ळवारी १० अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. त्यातच सकाळी सूर्यदर्शन न झाल्याने गारठ्यात जास्त भर पडली. सोमवारप्रमाणेच मंगळवारीही ढगाळ वातावरणामुळे थंडीत वाढ झाली.
चांद्रयान- २चे प्रक्षेपण येत्या मार्चमध्ये
'भारताच्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान- २ मोहिमेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, मार्च किंवा एप्रिल २०१८ मध्ये दुसऱ्या चांद्रमोहिमेचे प्रक्षेपण होणार आहे,' असे भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष डॉ. किरण कुमार यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'ला ही माहिती दिली. पहिल्या चांद्रमोहिमेनंतर दहा वर्षांनी चांद्रयान- २ ही मोहीम राबवण्यात येत असून, या मोहिमेमध्ये चंद्राभोवती फिरणारे मुख्य यान (ऑर्बायटर) चंद्रावर उतरणारे लँडर आणि चांद्रभूमीवर फिरू शकणाऱ्या रोव्हरचा समावेश असेल. भूस्थिर उपग्रह प्रक्षेपकाद्वारे (जीएसएलव्ही मार्क २) चांद्रयान २ चे उड्डाण श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रावरून होणार आहे.
एमआयडीसीत जमा करणार प्लास्टिक, ई-कचरा
कचऱ्यामुळे निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या समस्या पाहता, कचऱ्याच्या विघटनाबाबत जनजागृती वाढत आहे. आता डोंबिवली एमआयडीसी भागात काही महिला कार्यकर्त्यांनी संघटित होत प्लास्टिक व ई-कचरा जमा करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. जमा होणारे प्लास्टिकचे शास्त्रोक्त विघटन केले जाणार आहे, तर थर्मोकोल पालिकेकडे सोपवला जाणार आहे. या मोहिमेला १७ डिसेंबर रोजी सुरुवात होत आहे. कचऱ्याचे शास्त्रोक्त विघटन ही महापालिकांसाठी डोकेदुखी ठरली आहे. कल्याण येथील आधारवाडी भागात डम्पिंग ग्राऊंडवर दररोज या शहरांमधला ५५० टन कचरा टाकला जात असला तरी तिथे कचरा टाकण्यास दिवसेंदिवस विरोध वाढू लागला आहे.
नासाने शोधली आठ ग्रहांची नवी सूर्यमाला
अमेरिकेच्या 'नासा' या अंतराळ संशोधन संस्थेला मोठं यश मिळालं आहे. 'केपलर स्पेस टेलिस्कोप'द्वारे आठ ग्रह असलेल्या नव्या सूर्यमालेचा शोध लावला आहे. या सूर्यमालेत 'केप्लर ९०' नावाच्या ताऱ्याभोवती चारही बाजूने ग्रह फिरताना दिसत आहेत, असे नासाकडून सांगण्यात आलं आहे. नासाकडून गूगलच्या मदतीने 'एलियन वर्ल्ड'चा शोध घेण्यात येत आहे. केप्लर स्पेस टेलिस्कोपद्वारे या नव्या सूर्यमालेचा शोध लावण्यात आला असून त्यात आठ ग्रह आहेत. याचा व्हिडिओ 'नासा'ने ट्विट केला आहे. आपल्या सूर्यमालेत सूर्याभोवती ग्रह फिरतात. त्याचप्रमाणे नव्या सूर्यमालेतही एका ताऱ्याभोवती ग्रह फिरत आहेत.
'न्यूटन' ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर
सिनेजगतातील सर्वोच्च सन्मान मानल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कारांच्या शर्यतीतून भारताचं प्रतिनिधित्व करणारा 'न्यूटन' हा सिनेमा बाहेर पडला आहे. सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपटांच्या विभागातून 'न्यूटन'ला नामांकन मिळालं होतं. परंतु, त्याला अंतिम फेरीत धडक मारता आली नाही. 'अ फॅनटॅस्टिक वुमन', 'इन द फेड', 'ऑन बॉडी अँड सोल', 'फॉक्सट्राट', 'दी इनसल्ट' , 'लवलेस', 'द वुंड', 'फेलिसिटे', 'द स्क्वायर' या नऊ सिनेमांमध्ये आता ऑस्करसाठी चुरस होणार आहे.
पक्ष्यांच्या सुटकेसाठी आता टेलिस्कॉपिक रॉड
विजेच्या तारांमध्ये अडकलेल्या पक्ष्यांच्या सुटकेसाठी अग्निशमन दलाच्या जवानांना जीवाची बाजी लावावी लागते. त्यावर उपाय म्हणून महापालिकेने हलके टेलिस्कॉपिक रॉड खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. अग्निशमन दलाच्या वाहनावर उभे राहून रॉडच्या मदतीने पक्ष्यांची सुटका करता येणार असल्याने अग्निशमन जवानांना मोठा दिलासा मिळणार आहे. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यासह इमारत कोसळणे, समुद्रात बुडणाऱ्यांचे प्राण वाचवणे व अन्य आपत्कालिन परिस्थितीत काम करावे लागते. तसेच विजेच्या तारांसह उंचावर अडकलेल्या पक्ष्यांचा जीव वाचवण्याची जबाबदारीही अग्निशमन दलाला पार पाडावी लागते. दरवर्षी पक्षी अडकल्याचे सुमारे ४,५०० कॉल अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात येतात.
व्यायामाला प्रदूषणाचा फटका
थंडीच्या दिवसांत भल्या पहाटे उठून अनेक जण चालण्याचा व्यायाम करतात. शहरातील उद्याने, टेकड्यांसह प्रमुख रस्तेही मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्यांच्या गर्दीने फुललेले दिसतात. मात्र, शहरातील प्रमुख रस्त्यांवर मॉर्निंग वॉक करण्याची सवय कदाचित घातक ठरू शकते. रहदारीमुळे प्रदूषित झालेल्या रस्त्यांवर व्यायाम करताना प्रदूषके आणि धूलिकण शरीरात जाऊन फुफ्फुसे आणि रक्तवाहिन्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. याचा सर्वाधिक धोका वृद्ध व्यक्तींना होऊ शकतो, अशी भीती वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ वर्तवित आहेत. शारीरिक आरोग्य राखण्यासाठी पहाटे अनेक नागरिक चालण्याचा, धावण्याचा, सायकल चालविण्याचा व्यायाम करतात.
'ओखी'चा धोका; शाळा-कॉलेज उद्या बंद
ओखी वादळाचा धोका लक्षात घेऊन खबरदारी म्हणून मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ही घोषणा केली. Precautionary holiday declared on 5/12/17 for schools and colleges in Mumbai Metropolitan Region, Sindhudurga, Thane, Raigad and Palghar Districts for the safety of the students due to the serious weather predictions on #CycloneOckhi#MumbaiRains.
नाशिककरांना हवी काँक्रिटीकरणमुक्त गोदा
गोदापात्र पूर्वी कुंडांच्या वैभवाने बहरलेला होता. मात्र, नतंरच्या काळात गोदावरीपात्रात काँक्रिटीकरण केल्याने कुंडांचे अस्तित्व नष्ट झाले. गोदावरी पात्रातील हे अनैसर्गिक अतिक्रमण तातडीने काढण्याची गरज 'मटा' हेरिटेज वॉकमध्ये सहभागी झालेल्या नाशिककरांनी व्यक्त केली. पूर्वी प्रत्येक कुंड वेगवेगळ्या कारणांसाठी वापरात होते. ही व्यवस्था निर्माण करण्यामागेही कारणे होती. मात्र, दरम्यानच्या काळात ही कुंडे तोडून पात्राचे काँक्रिटीकरण झाले. ही कुंडे नेमकी कुठे आणि कशी होती, त्यांचा इतिहास काय होता, हे सामाजिक कार्यकर्ते देवांग जानी यांनी हेरिटेज वॉकमध्ये सहभागी झालेल्या नाशिककरांना गोदाघाटाचा फेरफटका घडवित सांगितले.
सहा महिन्यांत प्लास्टिकबंदी
देशभरातच सध्या प्लास्टिकच्या पि‍शव्या व इतरही वस्तूंचा प्रश्न गंभीर बनला असतानाच, 'येत्या सहा महिन्यांत राज्यात टप्प्याटप्याने पूर्णपणे प्लास्टिकबंदी करण्यात येईल', याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केला. राष्ट्रीय हरित लवाद आणि राज्य सरकारच्या पर्यावरण विभागातर्फे नरिमन पॉइंटच्या एनसीपीए सभागृहात आयोजित राष्ट्रीय पर्यावरण परिषदेच्या उद्‍घाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. 'येत्या सहा महिन्यात राज्यात प्लास्टिकवर पूर्णपणे बंदी आणण्यात येईल. प्लास्टिकला पर्यायी व्यवस्था निर्माण करण्यात येईल', असे मुख्यमंत्री आपल्या भाषणात म्हणाले. पर्यावरण मंत्री रामदास कदम हेही या परिषदेत उपस्थित होते.
नगर-दौंड रस्त्यावर झाडांची कत्तल
नगर-दौंड-बारामती या सुमारे ५९५ कोटी रुपये खर्चाच्या कामास सुरुवात करण्याअगोदर खड्डे बुजवले तर रोजचे अपघात टळतील. वन विभागाची परवानगी न घेताच झाडेही तोडली जात असल्याने संबंधित ठेकेदार कंपनीवर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे. नगर-दौंड रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरील खड्डे बुजवून तो सुस्थितीत करण्यासाठी अनेक आंदोलने झाली. राज्य सरकारकडे निधी नसल्याने केंद्र सरकारच्या निधीतून हा रस्ता होत आहे. राज्य रस्ते महामार्गाच्या पुणे येथील कार्यकारी अभियंत्यांच्या मार्गदर्शनाखाली हा रस्ता होत आहे. त्यासाठी ठेकेदार कंपनीकडून कामही सुरू करण्यात आले आहे.
प्लास्टिकपाठोपाठ थर्माकोलवर बंदी
राज्यात प्लास्टिकबरोबर थर्माकोलच्या उत्पादनांवरही बंदी आणण्यात येणार असून, याबाबतच्या धोरणाचा मसुदा तयार केला जात असल्याची माहिती पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी बुधवारी दिली. येत्या चार महिन्यांत जनजागृती आणि बंदीनंतरचे पर्याय सुचविले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामपंचायतींपासून मंत्रालय आणि सर्व सरकारी कार्यालयांमध्ये प्लास्टिक वापरू नये, अशा सूचनाही त्यांनी केल्या. प्लास्टिकबंदीचा कायदा लागू करण्यापूर्वीच्या प्रशासकीय तयारीसाठी विधान भवन येथे आयोजिलेल्या बैठकीनंतर कदम बोलत होते. देशात १७ राज्यांमध्ये प्लास्टिकबंदी असून, त्याधर्तीवर राज्यातही 'प्लास्टिकबंदी'चा कायदा येत्या गुढीपाडव्याला लागू केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
रविवारी दिसणार सुपरमून
येत्या रविवारी, ३ डिसेंबर रोजी मार्गशीर्ष पौर्णिमेच्या रात्री आकाशात 'सुपरमून' दिसणार आहे. पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ आला तर त्याला 'सुपरमून' म्हटले जाते. चंद्र पृथ्वीपासून सरासरी ३ लक्ष ८४ हजार किलोमीटर अंतरावर असतो. परंतु रविवारी चंद्र पृथ्वीपासून ३ लक्ष ५७ हजार किलोमीटर अंतरावर येणार आहे. सुपरमून योगाच्या वेळी पौर्णिमेचे चंद्रबिंब नेहमीपेक्षा सुमारे चौदा टक्के मोठे आणि सोळा टक्के जास्त तेजस्वी दिसते, अशी माहिती खगोल अभ्यासक पंचांगकर्ते दा. पौर्णिमेच्या दिवशी पृथ्वीजवळ आलेल्या चंद्राला रिचर्ड नोले यांनी सर्वप्रथम १९७९ मध्ये 'सुपरमून' असे नाव दिले.

Want to stay updated ?

x

Download our Android app and stay updated with the latest happenings!!!


50K+ people are using this