facebook pixel
chevron_right Sports
transparent
Live INDvsENG 3rd ODI : भारताचं इंग्लंडपुढे 257 धावांचं आव्हान
कर्णधार विराट कोहलीच्या शानदार 71 आणि शिखर धवनच्या तडाखेबाज 44 धावांच्या खेळीवर भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी 257 धावाचं आव्हान दिलंय. रोहित शर्मा आणि सुरेश रैना वगळता इतर खेळाडूंनी संयमी खेळी करत 256 धावाचा टप्पा गाठला. तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवशीय सामन्यासाठी इंग्लंडने टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने प्रथम फलंदाजी करत संयमी खेळी केली. मात्र,ओपनिंग जोडीला आलेला रोहित शर्मा 2 धावा करून झटपट बाद झाला. त्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि शिखर धवनने टीम इंडियाची कमान सांभाळली. दोघांनी शानदार फटकेबाजी केली.
भारताची बॅटिंग पुन्हा गडगडली, इंग्लंडला विजयासाठी २५७ रनची गरज
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक वनडेमध्ये भारताची बॅटिंग पुन्हा गडगडली. इंग्लंडचा कर्णधार इओन मॉर्गननं टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या बॉलरनीही मॉर्गनचा हा निर्णय योग्य ठरवला आणि भारतीय टीमला ५० ओव्हरमध्ये २५६/८ वर रोखलं. ओपनिंगला आलेल्या शिखर धवन आणि रोहित शर्माला या मॅचमध्ये चमकदार कामगिरी करता आली नाही. रोहित शर्मा २ रनवर आऊट झाला. तर शिखर धवन ४४ रनवर रन आऊट झाला. कर्णधार विराट कोहलीनं सर्वाधिक ७१ रन केल्या. तर धोनीनं ६६ बॉलमध्ये ४२ रन केल्या.
'करो या मरो'च्या सामन्यात हिंदुस्थानचे इंग्लंडपुढे २५७ धावांचे आव्हान
सामना ऑनलाईन | लीड्स. इंग्लंड आणि हिंदुस्थानी संघातील लीड्सच्या तिसऱ्या निर्णायक वनडेमध्ये प्रथम फलंदाजी करताना हिंदुस्थानने इंग्लंडसमोर २५७ धावांचे आव्हान ठेवले आहे. कर्णधार कोहलीच्या ७१, शिखर धवन ४४ आणि शार्दुल ठाकूरच्या नाबाद २२ धावांच्या बळावर टीम इंडियाने ५० षटकात ८ बाद २५६ धावा केल्या. इंग्लंडकडून राशिद आणि विलीने प्रत्येकी तीन बळी घेतले तर वूडला एक बळी मिळाला. धोनी-डिव्हिलिअर्सला जे जमले नाही ते विराटने करून दाखवलं यजमान इंग्लंडने नाणेफेक जिंकून टीम इंडियाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले आहे.
रशीदच्या फिरकीने भारताचा डाव 256 धावांत रोखला
आदिल रशीदने भारतीय फलंदाजांभोवती फिरकीचे जाळे टाकले. कप्तान विराट कोहलीसह तीन फलंदाजांना बाद करून आदील रशीदने भारताचा डाव 8 बाद 256 रोखण्यात यश मिळवेल. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करायचा इयॉन मॉर्गनचा निर्णय बरोबर का चूक ते ठरवणे कठीण आहे कारण हेडींगले मैदानावरच्या खेळपट्टीवर गोलंदाजांना मदत मिळत आहे. विराट कोहलीने 71 धावा केल्याने भारताला 256 धावांचा टप्पा गाठता आला. इंग्लंड कप्तान मॉर्गनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करायचा निर्णय घेतला. भारतीय संघात तीन बदल केले गेले.
फ्रान्सला जगज्जेता बनवण्यात १३ देशांचे योगदान
सामना ऑनलाईन | पॅरिस. सुमारे २० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर फ्रान्सने पुन्हा फुटबॉल विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. फ्रान्सच्या या विश्वविजेतेपदात १३ देशांशी संबंधित १७ खेळाडूंचे मोलाचे योगदान आहे.हे खेळाडू सध्या फ्रान्सचे नागरिक आहेत.पण त्यांचे मूळ आफ्रिका, युरोप आणि आशिया खंडात आहे. त्यातील काही निर्वासित म्हणून तर काही प्रवासी म्हणून फ्रान्समध्ये आले आणि फ्रान्सचेच नागरिक बनून त्यांनी या देशाला दुसऱ्यांदा फुटबॉलचा जगज्जेता बनवले आहे. फ्रान्सला फिफा विश्वचषकाचा विजेता बनविणाऱ्या फुटबॉलपटूंत आफ्रिकन वंशाच्या खेळाडूंचा भरणा सर्वाधिक आहे.
परविंदर अवानाची क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
भारताचा क्रिकेटपटू परविंदर अवाना यानं प्रथम श्रेणी आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून संन्यास घेतला आहे. ३१ वर्षांच्या अवानानं ट्विटरवरून निवृत्तीची घोषणा केली. फास्ट बॉलर असलेल्या परविंदर अवानानं २० डिसेंबर २०१२ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. तर १ डिसेंबर २००७ साली अवाना पहिली प्रथम श्रेणी मॅच खेळला. क्रिकेट खेळतानाचा प्रत्येक क्षण मी एन्जॉय केला. आता तरुणांना संधी द्यायची हीच योग्य वेळ आहे, असं ट्विट अवानानं केलं. २०१२ साली अवाना इंग्लंडविरुद्ध पुण्यात पहिली टी-२० मॅच खेळला. तर याच सीरिजमधल्या मुंबईत झालेल्या दुसऱ्या टी-२० मॅचमध्येही अवाना टीममध्ये होता.
धोनी-डिव्हिलिअर्सला जे जमले नाही ते विराटने करून दाखवलं
सामना ऑनलाईन । लीड्स. हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा कर्णधार आणि रनमशीन विराट कोहलीने इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या एक दिवसीय सामन्यात एक मोठा विक्रम केला आहे. विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधारपदाची भूमिका सांभाळताना ३ हजार धावांचा टप्पा ओलांडला. सर्वात कमी डावात हा टप्पा गाठणारा तो पहिला कर्णधार आहे. कोहलीने या यादीमध्ये हिंदुस्थानचा माजी कर्णधार आणि बेस्ट फिनिशर एम.एस. धोनी आणि दक्षिण आफ्रिकेचा थ्री सिक्स्टी खेळाडू ए.बी. डिव्हिलिअर्सलाही मागे सोडले आहे.
पॅट कमिन्सचे दात घशात; ब्रेट ली म्हणतो कोहली ऑस्ट्रेलियात शतकं ठोकणार
कोहलीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर शतक ठोकू देणार नाही, अशी दर्पोक्ती करून ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स याला आठवडा झाला असतानाच माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ब्रेट ली याने मात्र कमिन्सचे दात घशात घातले आहेत. विराट केवळ एक शतक नाही, अनेक शतके ठोकेल, असा विश्वास ब्रेट ली याने व्यक्त केला आहे. भारतीय संघ नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रलियामध्ये ३ टी२०, ४ कसोटी आणि ३ एकदिवसीय सामने खेळणार आहे. विराट कोहली ऑस्ट्रेलियात एकही शतक झळकावू शकणार नाही. भारतीय संघ ऑस्ट्रेलियात सपाटून मार खाईल. भारतीय उपखंडात विराट कोहलीचा धडाकेबाज फॉर्म कायम होता.
'विराट' विक्रम! हे रेकॉर्ड करणारा पहिलाच खेळाडू
भारत आणि इंग्लंडमधल्या तिसऱ्या वनडेमध्ये कर्णधार विराट कोहलीनं नवा विक्रम स्वत:च्या नावावर केला आहे. कर्णधार असताना सर्वात जलद तीन हजार रन करणारा विराट हा पहिलाच खेळाडू ठरला आहे. याआधी कर्णधार म्हणून विराटनं सर्वात जलद एक हजार आणि दोन हजार रन केल्या होत्या. विराट कोहलीनं ४९ इनिंगमध्ये ३ हजार रनचा टप्पा ओलांडला. १७ इनिंगमध्ये विराटनं एक हजार रन आणि ३६ इनिंगमध्ये दोन हजार रन केल्या. तीन हजार रन पूर्ण करण्यासाठी विराटला १२ रनची आवश्यकता होती. विराट कोहलीच्या आधी हे रेकॉर्ड दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सच्या नावावर होतं.
गेलचा अफलातून झेल; पहा व्हिडीओ…
विंडीजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल हा आपल्या तुफानी फलंदाजीसाठी आणि टी२० क्रिकेटमधील आपल्या विक्रमांसाठी कायम चर्चेत असतो. पण नुकतेच त्याने आपल्या क्षेत्ररक्षणामुळे सर्व क्रीडारसिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. ग्लोबल कॅनडा लीगमध्ये अंतिम सामन्यात व्हॅन्कुव्हर नाईट्स या संघाकडून खेळताना वेस्ट इंडिज बी संघाविरुद्ध पहिल्या स्लिपमध्ये त्याने झेल घेतला. त्याने एका हाताने पकडलेल्या या झेलमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. हा झेल घेऊन त्याने कावेम हॉज याला तंबूत परत पाठवले. फवाद अहमद याच्या गोलंदाजीवर हॉजने चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी बॅटच्या कडेला लागून चेंडू स्लिपमध्ये गेला.
अर्जुन तेंडुलकरच्या पहिल्या विकेटनंतर विनोद कांबळीच्या डोळ्यात अश्रू
भारताची अंडर-१९ टीम आणि श्रीलंकेची अंडर-१९ टीम यांच्यामध्ये ४ दिवसांच्या मॅचला सुरुवात झाली आहे. या मॅचमधून सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरनं पदार्पण केलं आहे. आपल्या पहिल्याच मॅचच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये अर्जुन तेंडुलकरनं विकेट घेतली. अर्जुन तेंडुलकरनं श्रीलंकेच्या कमील मिशाराला एलबीडब्ल्यू आऊट केलं. या विकेटनंतर अर्जुन तेंडुलकरवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. माजी क्रिकेटपटू आणि सचिनचा मित्र विनोद कांबळीनंही अर्जुन तेंडुलकरला शुभेच्छा दिल्या आहेत. अर्जुनला शुभेच्छा देताना विनोद कांबळीनं भावनिक ट्विट केलं आहे. मी हे बघितलं तेव्हा माझ्या डोळ्यांमध्ये अश्रू आले.
गतविजेते असलो तरीही प्रतिस्पर्ध्यांना हलकं लेखून चालणार नाही
आगामी आशियाई खेळांसाठी भारतीय हॉकी संघाच्या वेळापत्रकाची आज घोषणा करण्यात आलेली आहे. भारताचा समावेश अ गटात करण्यात आला असून तुलनेने भारतासमोर सोपं आव्हान असणार आहे. मात्र भारतीय संघाचे प्रशिक्षक हरेंद्रसिंह यांनी संघाला सावधानतेचा इशारा दिला आहे. भारतीय संघाने मागच्या आशियाई स्पर्धांचं विजेतेपद मिळवलं होतं. मात्र असं असलं तरीही प्रतिस्पर्धी संघांना आम्ही हलकं लेखणार नाहीयोत. माझ्या दृष्टीने भारतासाठी हा सोपा गट अजिबात नाहीये. श्रीलंका, हाँगकाँग चीन यांच्यासारख्या संघांविरोधात आम्हाला अधिक सजग रहावं लागणार आहे.
नाणेफेक जिंकून इंग्लंडची प्रथम गोलंदाजी
दोन सामन्यांनंतर मालिकेत १-१ अशी बरोबरी साधल्यानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यात आज अखेरचा सामना हेडिंग्लेच्या मैदानात खेळवला जातो आहे. या निर्णायक सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. अखेरच्या वन-डे सामन्यात इंग्लंडने दुखापतग्रस्त जेसन रॉय ऐवजी जेम्स विन्सला संघात जागा मिळाली आहे. तर भारतीय संघानेही लोकेश राहुल आणि सिद्धार्थ कौलला विश्रांती देऊन दिनेश कार्तिक आणि शार्दुल ठाकूरला संघात जागा दिली आहे. दुसऱ्या सामन्यात फलंदाजीदरम्यान मधल्या फळीने निराशा केली होती. धोनीने केलेल्या संथ खेळामुळे त्याच्यावर अनेकांनी टीका केली.
धोनीच्या खेळाने माझी बदनाम खेळी आठवली
सामना ऑनलाईन | नवी दिल्ली माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या इंग्लंडविरुद्धच्या ३७ धावांच्या कूर्मगती खेळीवरून आता विराट कोहली आणि प्रशिक्षक संजय बांगर यांच्यापाठोपाठ लिटल मास्टर सुनील गावसकर यांनीही त्याची पाठराखण केली आहे. कठीण परिस्थतीत धोनीसारख्या धडाकेबाज फलंदाजांची मंद खेळी मी समजू शकतो. त्याने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या वनडेत केलेल्या खेळीने मला माझी १९७५ च्या विश्वचषकातील १७५ चेंडूंत नाबाद ३६ धावांची बदनाम खेळी आठवली ,अशी प्रतिक्रिया हिंदुस्थानचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी आपल्या स्तंभात व्यक्त केली आहे.
इंग्लंडचा नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय
सामना ऑनलाईन | लीड्स. इंग्लंड आणि हिंदुस्थानी संघातील लीड्सच्या तिसऱ्या निर्णायक वनडेत मंगळवारी यजमान इंग्लंडने नाणेफेक जिंकून टीम इंडियाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले आहे. मालिकेतील १-१ अशा बरोबरीनंतर शेवटचा सामना जिंकून मालिका खिशात टाकण्यासाठी उभय संघ उत्सुक आहेत. आयसीसी मानांकनात १ आणि २ क्रमांकावर असणाऱ्या संघांतील ही क्रिकेट लढत अतिशय रंगतदार ठरणार आहे. हिंदुस्थानी संघाने आपल्या चमूत तीन बदल केले आहेत.
भारतीय हॉकी संघाचं वेळापत्रक जाहीर
इंडोनेशियातील जकार्ता शहरात खेळवण्यात येणाऱ्या १८ व्या आशियाई खेळांमधील भारतीय हॉकी संघाचं वेळापत्रक आज जाहीर करण्यात आलेलं आहे. या स्पर्धेसाठी भारतीय पुरुष संघाचा समावेश अ गटात करण्यात आला असून महिलांना ब गटात स्थान मिळालेलं आहे. आगामी २०२० टोकियो ऑलिम्पिकच्या दृष्टीकोनातून ही स्पर्धा भारतासाठी अत्यंत महत्वाची ठरणार आहे. आशियाई खेळांचं विजेतेपद मिळवणाऱ्या संघाला टोकिया ऑलिम्पिकमध्ये थेट प्रवेश मिळणार आहे. आशियाई खेळांसाठी पुरुष संघांची गटवारी - अ गट - भारत, कोरिया, जपान, श्रीलंका, हाँगकाँग चायना.
भारताविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये इंग्लंडनं टॉस जिंकला
भारताविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये इंग्लंडनं टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. या मॅचमध्ये भारतीय टीमनं तीन बदल केले आहेत. लोकेश राहुलऐवजी दिनेश कार्तिकला टीममध्ये संधी देण्यात आली आहे. तर सिद्धार्थ कौलऐवजी भुवनेश्वर कुमार आणि उमेश यादवऐवजी शार्दुल ठाकूरना टीममध्ये स्थान मिळालं आहे. पहिल्या वनडेमध्ये झालेल्या विजयानंतर दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा पराभव झाला. यामुळे ३ वनडे मॅचची सीरिज आता १-१नं बरोबरीत आहे. त्यामुळे टी-२० सीरिजनंतर वनडे सीरिजही जिंकण्यासाठी भारतीय टीम मैदानात उतरेल.
६६ व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या यजमानपदाचा मान महाराष्ट्राला
प्रो-कबड्डीमुळे भारतात कबड्डीला पुन्हा एकदा सोन्याचे दिवस आले असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. क्रिकेटनंतर देशात सर्वाधिक प्रेक्षकसंख्या असलेला खेळ म्हणून कबड्डीने आपली जागा निर्माण केली आहे. AKIF ने आगामी स्पर्धांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. याचसोबत प्रो-कबड्डी लीग, कबड्डी विश्वचषक, बीच कबड्डी अजिंक्यपद यांसारख्या अनेक महत्वाच्या स्पर्धांची वेळापत्रक आज कबड्डी फेडरेशनने जाहीर केली आहेत. त्यामुळे २०१७ साली राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचं विजेतेपद मिळवणारा महाराष्ट्राचा संघ यंदाच्या वर्षात आपल्या घरच्या मैदानावर विजेतेपद राखतो का याकडे सर्वांचं लक्ष असणारआहे.
अशी होती अर्जुन तेंडुलकरची पहिली विकेट
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरनं पहिली विकेट घेतली आहे. भारताच्या श्रीलंकेविरुद्धच्या अंडर-१९ टेस्ट मॅचला कोलंबोमध्ये सुरुवात झाली आहे. या मॅचमध्ये अर्जुन तेंडुलकरनं कमील मिशाराला एलबीडब्ल्यू आऊट केलं. अंडर-१९ क्रिकेटमधली ही अर्जुनची पहिली विकेट ठरली. या मॅचमध्ये श्रीलंकेनं टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. यानंतर भारताचा कर्णधार अनुज रावतनं अर्जुन तेंडुलकरला पहिली ओव्हर दिली. अर्जुन तेंडुलकरनं त्याच्या दुसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलला कमिलला एलबीडब्ल्यू केलं. डावखुरा फास्ट बॉलर असलेला अर्जुन तेंडुलकर याआधी मुंबईच्या अंडर १४ आणि अंडर १६ टीमकडून खेळला.
धोनीची बॅटिंग पाहून गावसकर यांना ती खेळी आठवली
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा ८६ रननी पराभव झाला. या मॅचमध्ये धोनीनं ५९ बॉलमध्ये ३७ रनची खेळी केली. धोनीच्या या संथ खेळीवर टीका होत आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेननं धोनीच्या या खेळीवर प्रश्न उपस्थित केले. तर भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनीही त्यांचं मत मांडलं आहे. धोनीच्या खेळीमुळे मला माझी १९७५ सालच्या वर्ल्ड कपची खेळी आठवल्याचं गावसकर म्हणाले. १९७५ सालच्या वर्ल्ड कपमधील इंग्लंडविरुद्धच्या मॅचमध्ये गावसकर यांनी १७४ बॉलमध्ये ३६ रन केल्या होत्या. या मॅचमध्ये भारताचा २०२ रननी पराभव झाला होता.

Want to stay updated ?

x

Download our Android app and stay updated with the latest happenings!!!


90K+ people are using this