facebook pixel
chevron_right Top
transparent
#MumbaiRains मुसळधार पावसामुळे मुंबईत साचले पाणी, रेल्वेसेवा विस्कळीत
मुंबईत कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सर्व रेल्वे लाईन्सवर पाणी भरल्याने लोकल उशिराने धावत आहेत. पश्चिम, मध्य व हार्बर लाईन्सवरील लोकल 5 ते 10 मिनिटे उशिराने धावत आहेत. सायन, वांद्रे स्टेशनात पाणी शिरल्याने काही तांत्रिक अडचणी उद्भवल्या आहेत. सकाळी साडेआठ वाजता मुंबईत 231.4 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार व संततधार पावसामुळे चाकरमान्यांचे हाल होत आहेत. लोकल उशिराने धावत असल्याने कामावर जायला उशीर होत आहे. रात्रभर पडलेल्या पावसामुळे मुंबईच्या सर्वच भागात पाणी साचले असल्याने त्याचा परिणाम वाहतुकीवरही होताना दिसत आहे.
मुलगी नाही, दुसराही मुलगाच झाला! आईने बाळाचा जीव घेतला
बिडकीन येथील पैठणखेडा गावात दहा महिन्याच्या चिमुरड्याची जन्मदात्रीनेच पाण्याच्या ड्रममध्ये बुडवून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आधीच एक मुलगा असल्यामुळे दुसरं अपत्य मुलगीच व्हावी, अशी महिलेची इच्छा होती. दोन मुलगे झाल्यामुळे पुढे मुलीसाठी कुटुंबीय नकार देतील, या भावनेतून तिने चिमुकल्याचं आयुष्य संपवलं. आरोपी महिला आपल्या वडिलांकडे राहायला आली होती. रात्री झोपल्यावर दहा महिन्यांचा प्रेम अचानक घरातून गायब झाल्याचा कांगावा तिने केला. इतकंच नाही, तर पोलिसात अपहरण झाल्याची तक्रारही तिने दिली. मात्र पोलिसांना एकूणच परिस्थिती पाहून संशय आला.
20 वर्षांनी स्टेजवर रेखाची अदाकारी, नृत्यानं आयफाचा माहोल झाला रंगीन
काल रात्री आयफा अॅवाॅर्डस 2018चा सोहळा रंगतदार झाला. बाॅलिवूडच्या बऱ्याच कलाकारांनी आपल्या परफाॅर्मन्सनी सोहळा देखणा केला. पण याला चार चाँद लावले ते अभिनेत्री रेखानं. 20 वर्षांनी रेखानं स्टेजवर आपला अनोखा अंदाज सादर केला. रेखानं मुकद्दर का सिकंदर सिनेमातल्या लतादीदींच्या आवाजातल्या एव्हरग्रीन गाण्यावर डान्स केला. सलाम ए इश्क या गाण्यावरच्या रेखाच्या नृत्यानं सगळा माहोल वेडाच झाला. आणि बराच वेळ टाळ्यांचा कडकडाट सुरू होता. याशिवाय रेखानं मुगल ए आझम, उमराव जान सिनेमांतल्या गाण्यावरही डान्स केला. विशेष पुरस्कार - अनुपम खेर.
डस्टबिनच बनवणार खत -Maharashtra Times
डिझाइन अँड डिग्री शो प्रथमेश राणे , आरएडीएव्ही कॉलेज घरातल्या डस्टबिनमध्ये तुम्ही कचरा टाकता, तो कचऱ्याचा डबाच दहा दिवसांत त्यातून खतनिर्मिती करतो. कशी वाटली ही कल्पना? अशीच स्मार्ट डस्टबिन तयार केलीय ऐश्वर्या माने या विद्यार्थिनीनं. आयडीसीच्या नुकत्याच पार पडलेल्या ' 'मध्ये ती पाहायला मिळाली. या शोमध्ये पाहायला मिळालेल्या काही उल्लेखनीय प्रोजेक्ट्सविषयी. एकापेक्षा एक नवनवीन कल्पनांचं भांडार म्हणून आयआयटीच्या इंडस्ट्रीयल डिझाइन सेंटरकडे (आयडीसी) पाहिलं जातं. विद्यार्थ्यांना आपल्या भन्नाट कल्पना मांडण्याची संधी आयडीसीच्या 'डिझाइन अँड डिग्री शो'मध्ये मिळते.
आमदार झोपले स्माशानात... मिळाला डासांचा प्रसाद
आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील तेलगूदेसम पक्षाच्या आमदाराने चक्क एक रात्र स्मशानात जोपून काढली. आमदारांनी स्मशानात झोपण्याचे कारण ऐकाल तर थक्क व्हाल. आजच्या विज्ञान युगातही लोकांना भूत, पिशाच्च आदी गोष्टींची भीती वाटते. म्हणूनच लोकांच्या मनातील भीती घालविण्यासाठी आमदार मोहदयांनी चक्क स्मशानातच एक रात्र घालवली. निम्मला रामा नायडू हे तेलगू देसम पक्षाचे आमदार आहेत. त्यांच्याच मतदारसंघातील एका गावात स्मशानभूमीचे नुतनीकरण करायचे होते. पण, या कामात अडथळा होता कामगारांच्या मनात असलेल्या भीतीचा. स्मशानभूमीत काम करण्यासाठी कोणीही कामगार तयार होत नव्हता.
महाआघाडीची शक्यता नाही, राहुल गांधींचं नेतृत्व मान्य नसल्याचे पवारांचे स्पष्ट संकेत
भाजप आणि नरेंद्र मोदींविरोधात देशात महाआघाडी स्थापन करण्याच्या प्रयत्नांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जोरदार धक्का दिलाय. देशात महाआघाडीची शक्यता दिसत नाही त्यामुळं त्याचा चेहेरा कोण असेल याचा प्रश्नच नाही, असं पवार यांनी न्यूज18 लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत सांगितलं. त्यामुळं महाघाडीचा चेहेरा कोण असेल याचा प्रश्नच नाही. देशातल्या सर्वच राजकीय पक्षांशी शरद पवार यांचे उत्तम संबंध आहेत. आणि अशा प्रयत्नांमध्ये पवार चाणक्य समजले जातात. मात्र शरद पवारांचं आजचं वक्तव्य हे भाजपच्या पथ्यावर पडू शकते.
विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षण मतदारसंघाच्या 4 जागांसाठी आज मतदान
विधान परिषदेच्या पदवीधर तसंच शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज सकाळी 7 ते सायंकाळी 5 दरम्यान मतदान सुरू झालं आहे. विधानपरिषदेच्या चार जागांसाठी मतदान होणार आहे. यातील मुंबई आणि कोकण पदवीधर मतदासंघातील निवडणूक सर्वाधिक लक्षवेधी ठरणार आहे. शिवसेनेकडून विलास पोतनीस, भाजपकडून अमितकुमार मेहता निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेले शेकापचे उमेदवार राजेंद्र कोरडे, नारायण राणे यांच्या स्वाभिमान पक्षाचे उमेदवार राजेंद्र बंडगर अशी बहुरंगी निवडणुक आहे. मुंबई शिक्षक मतदारसंघात भाजपकडून अनिल देशमुख, शिवसेनेचे शिवाजी शेंडगे हे निवडणूक रिंगणात आहेत.
क्रूर आईने 10 महिन्याच्या बाळाला पाण्याच्या पिंपात टाकून मारलं !
औरंगाबादमध्ये दुसरा मुलगा झाला म्हणून त्याचा खून करण्यात आला आहे. सहसा मुलगी झाली म्हणून तिला रस्त्यावर फेकून देणं किंवा तिला मारून टाकणे या घटना पाहिल्या असतील मात्र दुसरा मुलगा झाला म्हणून त्याला मारून टाकल्याची धक्कादायक औरंगाबादमध्ये घटली आहे. ही घटना तीन दिवसांपूर्वी घडली आहे. दुसराही मुलगाच झाला म्हणून पैठण खेड्यातील मातीने आपल्या 10 महिन्याच्या बाळाला पाण्याच्या पिंपात टाकून त्याचा जीव घेण्यात आला आहे. सुरवातीला बाळ गायब झालं म्हणून तक्रार दिली मात्र सकाळी बाळ पिंपात मेलेल्या अवस्थेत सापडलं. या सगळ्या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
गांगुली म्हणतो; विराट घाबरलाय! -Maharashtra Times
'वनडेतील ५० षटकांच्या खेळात ५०० धावा होत आहेत, हा भयंकर प्रकार आहे. गोलंदाजांनी यावर तोडगा काढायला हवाच; पण प्रशासनानेही यासाठी पाउले उचलायला हवीत,' असं परखड मत टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनं व्यक्त केलंय. टीम इंडियाच्या आगामी इंग्लंड दौऱ्याबाबत पत्रकारांशी बोलताना गांगुलीनं सध्याच्या क्रिकेटविषयी त्याची रोखठोक मतं मांडली. 'गोलंदाजांना विश्रांती मिळावी, यासाठी 'रोटेशन' पद्धत असावी, असे वाटत नाही. आमच्यावेळी वसिम अक्रम, वकार युनूस वनडे व कसोटी अशा दोन्ही क्रिकेटमध्ये सातत्याने यश मिळवायचे. मॅग्रा, ब्रेट ली तसेच पोलॉक आणि डोनाल्डही सतत क्रिकेट खेळले आहेत.
बाबा रामदेव यांना दणका, बीएसएफने योग प्रशिक्षणाचा करार संपवला
आंतरराष्ट्रीय योगदिनाची सुरूवात झाल्यापासून बाबा रामदेव यांच्या पतंजलीच्या बॅनरखालीच सीमा सुरक्षा दलाचं (बीएसएफ) योग शिबीर व्हायचं, पण आता त्यांची जागा ईशा फाउंडेशनने घेतली आहे. बीएसएफने पतंजलीसोबत करार संपवून आता सदगुरू जग्गी वासूदेव यांच्या ईशा फाउंडेशनशी करार केला आहे. यावर्षी आंतरराष्ट्रीय योगदिनी जग्गी वासूदेव स्वतः सियाचीनमध्ये जवानांना योग प्रशिक्षण देत होते. इंडियन एक्सप्रेसशी बोलताना, एकाच व्यक्तीकडून किंवा संस्थेकडून प्रशिक्षण घ्यावं अशी काही अट नाहीये, असं बीएसएफकडून सांगण्यात आलं. आता बाबा रामदेव यांच्या पतंजलीचा बीएसएफशी कोणताही करार नाही.
…तर आरएसएसच्या कार्यक्रमाला मीही गेलो असतो : दिग्विजय सिंह
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा बचाव केला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल प्रणव मुखर्जी यांना मोठ्या टीकेचा सामना करावा लागला. पण, जर संघाने मला निमंत्रण दिलं असतं तर मीही कार्यक्रमाला गेलो असतो, असं वक्तव्य दिग्विजय सिंह यांनी केलं आहे. मुखर्जी यांनी संघाचं निमंत्रण स्वीकारून काहीही चुकीचं केलेलं नाही, असंही ते म्हणाले. इकॉनॉमिक टाइम्ससोबत बोलताना सिंह म्हणाले, जर आरएसएसने मला बोलावलं असतं तर मीही गेलो असतो.
FIFA World Cup 2018 : जपान-सेनेगलचा सामना बरोबरीत
सेनेगलच्या सादिओ मॅनेनं 11 व्या मिनिटाला गोल डागत सेनेगलला आघाडी मिळवून दिली. पण 34 व्या मिनिटालाच ताकाशी इनुईनं 15 मीटरवरुन चेंडू गोलपोस्टमध्ये धाडत जपानला बरोबरीवर आणून ठेवलं. 71 व्या मिनिटाला सेनेगलच्या मौसा वेगनं दुसरा गोल नोंदवला. त्यामुळे सेनेगल या सामन्यात जिंकणार असं दिसत असतानाच बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरलेल्या केईसुक होंडानं जपानला 2-2 अशी बरोबरी साधून दिली. मॉस्को : जपान आणि सेनेगल संघांमधला 'ह' गटातला दुसरा साखळी सामना 2-2 असा बरोबरीत सुटला.
संघाच्या कार्यक्रमाला मीही गेलो असतो: दिग्विजय -Maharashtra Times
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) कार्यक्रमात सहभागी झाल्यामुळं माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींवर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची नाराजी असल्याचं बोललं जात असतानाच, संघावर नेहमीच सडकून टीका करणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी मुखर्जी यांचे जोरदार समर्थन केले आहे. संघाने मला निमंत्रित केले असते, तर मीही त्या कार्यक्रमाला गेलो असतो, असे ते म्हणाले. 'सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासोबत व्यासपीठावर जाण्यात गैर काय? मी त्या कार्यक्रमाला गेलो असतो तर त्यांना आरसा दाखवला असता. त्यांच्यासमोर माझी विचारधारा मांडली असती,' असं दिग्विजय सिंह यांनी 'इकॉनॉमिक टाइम्स'ला दिलेल्या एक्सक्लूझिव्ह मुलाखतीत सांगितलं.
पासपोर्ट प्रकरण : सुषमा स्वराज यांना 'आवडले' त्यांच्याविरोधातील ट्विट
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये हिंदू-मुस्लिम दांपत्याला पासपोर्ट जारी करण्यावरुन झालेला वाद नुकताच शमला, मात्र या प्रकरणाची चौकशी अद्याप बाकी आहे. सोशल मीडियावर वाद वाढल्यानंतर दांपत्याला तातडीने पासपोर्ट जारी करण्यात आला, पण त्यानंतर पासपोर्ट अधिकाऱ्याची बदली केल्याने वाद आणखी वाढायला सुरूवात झाली. प्रकरण समोर आल्यानंतर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना ट्विटरवर लक्ष्य करण्यात येत आहे. सुषमा स्वराज यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे, त्यांच्याविरोधात असभ्या भाषेचा वापर केला जात आहे. मात्र सुषमा स्वराज यांनी आपल्याविरोधात केल्या जाणऱ्या या सर्व ट्विटचं स्वतःच वेगळ्या पद्धतीने स्वागत केलं आहे.
अबब! १५०० रूपयांचा आंबा, हळूच तोडा, कापडात ठेवा
खरं म्हणजे कोणतेही फळ, त्याची खरेदी आणि सेवन ही कोणाचीही मक्तेदारी असत नाही. पण, एक काळ होता फळांचा राजा आंब्याबाबत हे अगदी खरे होते. कोहितूर प्रजातीचा हा आंबा एकेकाळी केवळ राजघराण्यातील व्यक्तिंसाठीच आसायचा. या आंब्याच्या गुणवैशिष्ट्यांमुळे आजही या प्राजातीचे आंबे केवळ श्रीमंत किंवा पैसे खर्च करण्याची तयारी असणाऱ्या मंडळींनाच खरेदी करता येतात. याच आंब्याला भौगोलिक ओळख मिळावी यासाठी पश्चिम बंगाल सरकार आता प्रयत्न करत आहे. खास करून नवाब सिराज उदौला याच्या काळात हे आंबे केवळ राजघराण्यातील व्यक्तिंसाठी असायचे.
राम रहीम असलेल्या तुरुंगाला नमस्कार; ८ जणांना अटक -Maharashtra Times
बलात्कार प्रकरणात अटकेत असलेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम ज्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे, त्या तुरुंगाला राम रहीमचे शिष्य रोज भेट देत असून बाहेरूनच नमस्कार करून जात आहेत. या प्रकारामुळे पोलीस चक्रावून गेले असून त्यांनी राम रहीमच्या या भक्तांना अटक करण्यास सुरुवात केली आहे. रविवारीही त्याचे काही भक्त तुरुंगाजवळ आले होते. तुरुंगाला दुरूनच नमस्कार करत असताना पोलिसांनी त्याच्या ८ भक्तांना ताब्यात घेतले असून त्यांची कारही जप्त केली आहे.
वाजपेयींच्या तब्येतीच्या चौकशीसाठी सुरक्षेविनाच मोदी 'एम्स'मध्ये!
किंबहुना, मोदी एम्समध्ये पोहोचल्यानंतर रुग्णालय प्रशासनाला ते आल्याचे कळले. रुग्णालय प्रशासनालाही पूर्वसूचना देण्यात आली नव्हती. पंतप्रधान नरेंद्र मोदी जवळपास 45 मिनिटं एम्समध्ये होते. तिथे त्यांनी डॉक्टरांकडून वाजपेयींच्या तब्येतीची माहिती घेतली. दोन दिवसांपूर्वी वाजपेयींना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र आता त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. 93 वर्षीय अटल बिहारी वाजपेयी 11 जून 2018 रोजी उपचारासाठी एम्समध्ये दाखल झाले आहेत. किडनीच्या आजारामुळे त्यांनी एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. वाजपेयी 2009 सालापासूनच आजारी आहेत. त्यांना चालण्या-फिरण्यासाठी व्हिलचेअरचा वापर करावा लागतो. अटल बिहारी वाजपेयी हे डिमेंशिया आजाराने त्रस्त आहेत.
LIVE मुसळधार पावसामुळे मुंबईचे हाल, सखल भागात साचलं पाणी, रेल्वे रूळ पाण्याखाली
मुंबईसह उपनगरात रात्रभरापासून पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलंय आहे. नवी मुंबई, अंधेरी, गोरेगाव, वसई, विरार भागातही जोरदार पाऊस सुरु आहे. या दरम्यान पाणी भरल्यामुळे सकाळी ऑफिससाठी निघणाऱ्या मुंबईकरांची चांगलीच पंचाईत होतेय. सायन स्टेशनवर एक्सप्रेस, आणि लोकल ट्रेन ट्रॅकवर नाही तर पाण्यावर धावताना दिसतायत. रस्त्यावर पाणी असल्याने काही ठिकाणी गाड्याही बंद पडल्या आहेत. दरम्यान, पावसामुळे तिन्ही मार्गावरच्या रेल्वे धिम्या गतीने आहेत. 15 ते 20 मिनिटं उशिराने धावत आहे. येत्या 24 तासातही मुंबईसह उपनगरात जोरदार पावसाचा अंदाजही वर्तवण्यात येतोय.
अनैतिक संबंधांवरून महिलेला मारहाण करून केले टक्कल
सामना ऑनलाईन । गुवाहटी आसाममधील नागाव जिल्ह्यात एका विवाहित महिलेला तिच्या प्रियकरासोबत रंगेहाथ पकडल्यानंतर गावकऱ्यांनी त्या महिलेला बेदम मारहाण करत तिचे मुंडन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या महिलेच्या प्रियकराला देखील गावकऱ्यांनी जबर मारहाण केली आहे. या मारहाणीत महिला व तिचा प्रियकर जबर जखमी झाला असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. झुरमुर गावात राहणाऱ्या सदर महिलेचे एका पुरुषासोबत विवाहबाह्य संबंध होते. तिचा प्रियकर रविवारी रात्री तिला भेटायला आला. त्यावेळी गावकऱ्यांनी त्यांना रंगेहाथ पकडले. त्यानंतर गावकऱ्यांनी त्या दोघांनाही रात्रभर बेदम मारहाण केली.

Want to stay updated ?

x

Download our Android app and stay updated with the latest happenings!!!


90K+ people are using this